Advertisement

फायर ब्रिगेडच्या ताफ्यात 104 मीटरची 'टर्न टेबल लॅडर'

अग्निशमन दलाकडे सद्य:स्थितीत 32 मीटर, 40 मीटर, 55 मीटर, 64 मीटर तसेच 90 मीटर उंचीच्या ‘टर्न टेबल लॅडर’ उपलब्ध आहेत.

फायर ब्रिगेडच्या ताफ्यात 104 मीटरची 'टर्न टेबल लॅडर'
SHARES

गगनचुंबी इमारतीत लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 10 वर्षांनंतर मुंबई (mumbai) अग्निशमन दलाच्या (fire brigade) ताफ्यात 104 मीटर उंच 'टर्न टेबल लॅडर’ दाखल होणार आहे.

'टर्न टेबल लॅडर’मुळे जवळपास 34 मजल्यांपर्यंतच्या आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

अग्निशमन दलाकडे सद्य:स्थितीत 32 मीटर, 40 मीटर, 55 मीटर, 64 मीटर तसेच 90 मीटर उंचीच्या ‘टर्न टेबल लॅडर’ उपलब्ध आहेत.

मात्र, 90 मीटर लॅडर वारंवार नादुरुस्त होत असल्याने उंच इमारतींमधील आग विझविताना अडचणी निर्माण होत होत्या. यावर उपाय म्हणून महापालिकेने गेल्या वर्षी 104 मीटर उंचीच्या दोन ‘टर्न टेबल लॅडर’ खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती.

ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून लवकरच अत्याधुनिक शिड्या (ladder) अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

सध्या 64 मीटर लॅडरद्वारे सुमारे 21 व्या मजल्यापर्यंत तर 68 मीटर उंचीच्या शिडीद्वारे 23 ते 25 व्या मजल्यापर्यंत पोहोचता येते. 90 मीटर लॅडरच्या मदतीने सुमारे 34 मजल्यांपर्यंत आग विझविणे शक्य होणार आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, नव्या 104 मीटर ‘टर्न टेबल लॅडर’मुळे 34 मजल्यांपर्यंत थेट पोहोचून आग विझविणे, बचावकार्य करणे आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे सहजरित्या आणि वेगाने शक्य होणार आहे.



हेही वाचा

नेरुळमध्ये मनसेकडून नाले सफाईची ‘पोलखोल’

अंधेरी पूर्वेतील 'या' रस्त्यांवर 27 ऑगस्टपर्यंत ऑड-इव्हन पार्किंग नियम लागू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा