Advertisement

मुंबईत टाटाच्या आणि महावितरणच्या वीज शुल्कात 'इतकी' कपात

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महावितरण आणि टाटाचे वीजदर कमी होणार आहेत.

मुंबईत टाटाच्या आणि महावितरणच्या वीज शुल्कात 'इतकी' कपात
SHARES

आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. या नवीन वर्षात काही मोठे बदल होणार आहेत. आजपासून ग्राहकांच्या खिशाला महागाईची कात्री लागणार आहे. मात्र, यादरम्यान मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महावितरणचे वीजदर कमी होणार आहेत. यासोबतच टाटाचे वीज शुल्कही कमी होणार आहे. यामुळे घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. बेस्टच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही.

नवीन आर्थिक वर्षात विजेच्या दरात कपात करण्यात आली आहे. महावितरणचे वीज शुल्क दोन टक्क्यांनी कमी होणार आहे. दुसरीकडे टाटाच्या मुंबईकरांकडून वापरल्या जाणाऱ्या विजेचे दर चार टक्क्यांनी कमी होणार आहेत. त्याचवेळी अदानीच्या किमतीत वाढ होणार आहे. बेस्टचे विजेचे दरही स्थिर राहतील.

टाटाच्या घरगुती ग्राहकांना आजपासून लागू झालेल्या नवीन वीज दरामुळे दिलासा मिळाला आहे. या ग्राहकांच्या वीज दरात ४ टक्के, तर महावितरणच्या वीज दरात २ टक्क्यांनी कपात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अदानी ग्राहकांच्या बिलात प्रति युनिट १ ते ६ पैशांनी वाढ होणार आहे.

नवीन आर्थिक वर्ष २०२२-२०२३ आजपासून सुरू झाले आहे. या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल होतील. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

दुसरीकडे, आज सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधित इतर गोष्टींमध्ये बदलाव पाहायला मिळत आहे. आजपासून महाराष्ट्रातील कोरोनावरील सर्व निर्बंध उठवले जाणार आहेत. यासोबतच आता मास्कसक्ती नाही. मुंबई लोकलमध्ये देखील दोन डोस न झालेले देखील प्रवास करू शकतात.  



हेही वाचा

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्यांचा खर्च सरकार उचलणार

लोकल प्रवासासाठी लसीकरणाचे दोन डोस आवश्यक नाही, पण...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा