नवी दिल्लीतील (new delhi) जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) मराठी संस्कृती आणि इतिहासाला चालना देण्यासाठी दोन केंद्रे स्थापन केली जातील. पहिले मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित, मराठा इतिहास, शासन आणि लष्करी रणनीती यावर लक्ष केंद्रित करेल.
तसेच दुसरे, प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक कुसुमाग्रज यांच्या नावावर, मराठीचा अभिजात भाषेचा अभ्यास वाढविण्यासाठी आणि साहित्य आणि भाषाशास्त्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी. या दोन्ही केंद्रांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार 24 जुलै रोजी करतील.
बुधवारी माध्यमांशी बोलताना मराठी भाषा राज्यमंत्री उदय सामंत (uday samant) म्हणाले की, या उपक्रमांचा उद्देश देशभरातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या (maharashtra) समृद्ध सांस्कृतिक आणि भाषिक वारशाची सखोल माहिती देणे आहे.
उदय सामंत म्हणाले की, जेएनयूने या दोन्ही केंद्रांसाठी त्यांच्या कॅम्पसमध्ये जमीन देण्यास तत्वतः सहमती दर्शविली आहे, जिथे राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील उभारेल.
"मी दोन महिन्यांपूर्वी जेएनयूला भेट दिली होती आणि कुलगुरूंशी याबद्दल चर्चा केली होती. चर्चेदरम्यान मला जाणवले की राज्य सरकारने 16 वर्षांपूर्वी जेएनयूला मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी 2 कोटी रुपये दिले होते आणि त्यांना आणखी 3 कोटी रुपये हवे होते . मराठी भाषा मंत्री म्हणून मी उर्वरित निधी ताबडतोब मंजूर केला. कुसुमाग्रजांचे नाव देण्यात यावे असा माझा आग्रह होता." असे उदय सामंत म्हणाले
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी शिवाजी महाराजांवर केंद्रित असलेल्या अभ्यास केंद्रासाठी 10 कोटी रुपयांचे अनुदान दिले होते.
हेही वाचा