Advertisement

डॉक्टरांच्या विद्या वेतनवाढीसंदर्भातील निर्णय बुधवारी


डॉक्टरांच्या विद्या वेतनवाढीसंदर्भातील निर्णय बुधवारी
SHARES

असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्रच्या विद्यार्थी आणि डॉक्टरांनी विद्या वेतनवाढीसाठी गुरुवारी निषेध मोर्चा काढला होता. त्याची दखल सरकारदरबारी घेण्यात आली असून या संदर्भात बुधवारी निर्णय घेण्यात येईल.

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांशी विद्यावेतनासंदर्भात चर्चा करण्यासाठी २ मे रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत विद्या वेतनाविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.


मागणी पूर्ण न झाल्यास...

२०१५ मध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने प्रति महिना ११ हजार रुपये वेतनवाढीस मंजुरी दिली होती. पण, अनियमित पाठपुराव्यांमुळे ही वेतनवाढ अंमलात आणली गेली नसल्याचं शिकाऊ विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मागणी पूर्ण न झाल्यास ३ मे पासून कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


इतकं वेतन द्या...

राज्य सरकारच्या मेडिकल कॉलेजमध्ये १ वर्षाची इंटर्नशीप करणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या महिन्याला फक्त ६ हजार रुपये वेतन म्हणून दिलं जातं. पण, आता हे वेतन ६ हजारांहून २൦ हजारांपर्यंत द्यावं, अशी मागणी या शिकाऊ विद्यार्थ्यांनी केली आहे.

साडेचार वर्षांच्या पदव्युत्तर शिक्षणानंतर या मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची सेवा सरकारी रुग्णालयात द्यावी लागते. त्यात हे विद्यार्थी आठवड्याला ६൦ ते ७൦ तास काम करतात. त्यामुळे सरकारने शिकाऊ मुलांना देण्यात येणाऱ्या वेतनात वाढ करावी, या मागणीसाठी असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स महाराष्ट्रच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन गुरुवारी जे. जे. रुग्णालयात निषेध व्यक्त केला.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा