Advertisement

जुहूतील हॉटेल सी प्रिंसेसमध्ये आग

हॉटेल सी प्रिंसेसच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती.

जुहूतील हॉटेल सी प्रिंसेसमध्ये आग
SHARES

मुंबईतील जुहू परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास आग लागल्याची माहिती समोर येत आहे. जुहूतील हॉटेल सी प्रिंसेसमध्ये आग लागली होती. सोमवारी सकाळी १०:३५ वाजताच्या सुमारास आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल सी प्रिंसेसच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी पाण्याचा स्त्रोत सुरू ठेवत आगीवर नियंत्रण मिळवलं.

आगीची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं अग्निशमन दल आणि पोलिसांनी धाव घेत चौकशीला सुरूवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग संबंधित परिसरात असलेल्या कचऱ्याला लागली. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा