Advertisement

मराठी पाट्यांबाबत 'इतक्या' आस्थापनांना नोटीस

294 दुकाने व आस्थापनांनी प्रवेशद्वारावर दिसतील अशा स्वरूपात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दुकाने व आस्थापना विभागाच्या निदर्शनाला आले आहे.

मराठी पाट्यांबाबत 'इतक्या' आस्थापनांना नोटीस
SHARES

नियमांनुसार दुकाने व आस्थापनांच्या ( प्रवेशद्वारावर दिसतील अशा ठळक स्वरूपात मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे.

असे असले तरी अनेक दुकाने व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याने दुसऱ्या टप्प्यात 294 दुकाने व आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्याचे विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांनी सांगितले.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात शॉपिंग मॉल, नामांकित आस्थापने रडारवर आहेत. मराठी पाट्या (marathi signboards) लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनाला आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा दीक्षा कारकर यांनी दिला आहे.

मुंबईतील (mumbai) दुकाने व आस्थापनांना दिसतील अशा प्रकारे मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात मुंबईतील 36 हजार 773 आस्थापनांची झाडाझडती घेतली.

यात 1,124 आस्थापनांचा अहवाल तयार केला असता 1,124 अस्थापनांना न्यायालयात खेचण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मराठी नामफलक न लावणाऱ्या 638 दुकानांवर आणि आस्थापनांवर महापालिकेने न्यायालयात दावे दाखल केले आहे.

तसेच त्यापैकी 143 आस्थापनांवरील न्यायालयीन खटल्यांची कारवाई अंतिम टप्प्यात आहे तर काही प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यासाठी आलेल्या अर्जापैकी 190 आस्थापनांच्या मालकांकडून 12 लाख 23 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मराठी नामफलकांसाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी व मुंबई महापालिकेच्या विधी समिती अध्यक्षा दीक्षा कारकर यांच्या पुढाकाराने पहिल्या टप्प्यात मे महिन्यापासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.

दुसऱ्या टप्प्यात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर दरम्यान एस. व्ही. रोड व एलजीएस रोडवरील तब्बल 9,789 दुकाने व आस्थापनांची झाडाझडती घेतली.

यात 294 दुकाने व आस्थापनांनी प्रवेशद्वारावर दिसतील अशा स्वरूपात मराठी पाट्या लावण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दुकाने व आस्थापना विभागाच्या निदर्शनाला आले आहे.

तसेच त्यामुळे 294 दुकाने व आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्याचे दीक्षा कारकर यांनी सांगितले.



हेही वाचा

मध्य रेल्वे रेल्वे 'या' स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारणार

मनोज जरांगेंचा मुंबईचा मोर्चा रद्द होण्याची शक्यता


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा