ठाण्यातील (thane) दुसऱ्या सॅटिस पुलाच्या कामाला पावसाळा (monsoon) आणि प्रलंबित रेल्वे मंजुरीमुळे विलंब झाला आहे. तरी डिसेंबरमध्ये काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून लवकरच प्रकल्प पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, पाऊस कमी झाला असल्याने बांधकाम लवकरच सुरू होईल.
2.4 किलोमीटरच्या एलिव्हेटेड रोडपैकी बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तथापि, ठाण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) अपूर्ण आहे.
ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सुरुवातीला मे महिन्यात साइट भेटीदरम्यान दुसऱ्या सॅटिस पुलासाठी ऑगस्ट 2024 पूर्ण होण्याची तारीख वर्तवली होती. मात्र, पावसाळा आणि रेल्वेच्या कामकाजाशी संबंधित आव्हानांमुळे हा या कामकाजाला विलंब झाला.
2018 मध्ये सुरू झालेला दुसरा सॅटीस प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट ठाणे पूर्वेतील गर्दी कमी करण्याचे आहे. यामुळे ठाणे पश्चिमेतील पहिल्या सॅटीस पुलावरील भार कमी होणार आहे.
ठाणे स्मार्ट सिटी योजनेचा एक भाग असलेल्या 270 कोटी रुपयांच्या प्रकल्पामध्ये एलिव्हेटेड बस डेक, स्कायवॉक आणि फूट ओव्हरब्रिजचा समावेश आहे.
ROB पूर्ण करण्यासाठी आवश्यक ब्लॉकसाठीचा प्रस्ताव अद्याप सादर केलेला नाही. तपशीलवार प्रस्तावाशिवाय रेल्वे (railway) विभाग नियोजनात पुढे जाऊ शकत नाही किंवा आवश्यक ब्लॉक मंजूर करू शकत नाही.
सॅटीस (SATIS) प्रकल्प मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP) चा एक भाग म्हणून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या सहकार्याने हाती घेतला जात आहे, आणि त्याला जागतिक बँकेने निधी दिला आहे.
हेही वाचा