Advertisement

ठाणे : घोडबंदर रोडवरील मेट्रो 4 स्थानकाच्या बांधकामासाठी वाहतुकीत बदल

हे वाहतूक बदल 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे

ठाणे : घोडबंदर रोडवरील मेट्रो 4 स्थानकाच्या बांधकामासाठी वाहतुकीत बदल
SHARES

घोडबंदर येथील मानपाडा परिसरातील मेट्रो स्थानकाचे काम मार्गी लावण्यासाठी ठाणे पोलिसांनी मंगळवार, ७ नोव्हेंबरपासून वाहतूक बदल लागू केला आहे. त्यानुसार मानपाडा ते तत्वज्ञान विद्यापीठ या सर्व्हिस रोडवर वाहतुकीस बंदी असणार आहे. त्यामुळे या वाहनांचा भार मुख्य व पर्यायी रस्त्यावर येऊन कोंडी वाढण्याची शक्यता आहे. हे वाहतूक बदल 15 दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू राहणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

घोडबंदर मार्गावरील मानपाडा परिसरात वडाळा-घाटकोपर-कासारवडवली मेट्रो फोर लाईनचे काम सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घोडबंदर मार्गावरील मेट्रो मार्गासाठी खांब उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. 

सध्या येथे 'यू' आकाराचे बीम उभारले जात आहेत. तसेच मानपाडा परिसरात स्टेशन बांधण्याचे कामही सुरू आहे. मानपाडा परिसरात मुख्य रस्ता अरुंद आहे. तसेच येथून जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरही वाहनांची वर्दळ असते.  

स्थानकाच्या बांधकामादरम्यान कोणताही अपघात आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत. हे वाहतूक बदल 15 दिवसांच्या चाचणी तत्त्वावर लागू करण्यात आले आहेत. 


नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात तीन हात नाका येथील ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयात पाठवाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतीही हरकत किंवा सूचना न आल्यास पुढील आदेश येईपर्यंत हे वाहतूक बदल कायम ठेवण्यात येतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले.


असे वाहतूक बदल आहेत

ठाण्यातून घोडबंदर सेवा रोडवरून मानपाडा, मनोरमानगर, आर मॉलकडे जाणाऱ्या वाहनांना विहंग हॉटेलमध्ये प्रवेश बंदी असेल. येथील वाहने ढोकळी किंवा कापूरबावडी मार्गे जातील

सेवा रोडवरून घोडबंदरहून तत्वज्ञान विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांना दोस्ती इम्पेरिया इमारतीजवळ प्रतिबंधित करण्यात येणार आहे. येथील ही वाहने खेवरा चौक, डॉ. काशिनाथ घाणेकर येथून वसंत विहार मार्गे जातील.

मानपाडा ते तत्वज्ञान विद्यापीठ या सर्व्हिस रोडवर आणि तत्वज्ञान विद्यापीठ ते मानपाडा या सर्व्हिस रोडवर वाहने पार्क करण्यास मनाई आहे.


हेही वाचा

Mumbai Local News: 6वी लाईन आता बोरिवलीपर्यंत वाढवली जाणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा