Advertisement

नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यानं महापौरांना पाठवलं ई-चलान

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विलेपार्ले इथं 'नो पार्किंग झोन'मध्ये गाडी केल्यानं दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्यानं महापौरांना पाठवलं ई-चलान
SHARES

मुंबईत 'नो पार्किंग'च्या नावाखाली जबर दंड वसूल केला जात आहेअसं असताना मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विलेपार्ले इथं 'नो पार्किंग झोन'मध्ये गाडी पार्क केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर, सामान्यांकडून दंड वसूल केला जातो, त्याप्रमाणं महापालिका त्यांच्याकडून दंड वसूल करणार का? असा सवाल केला जात होता. परंतु, आता महापौरांना मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने ई-चलाना पाठवत दंड ठोठावल्याची माहिती समोर आली आहे.

कधी केली होती कार पार्क?

महापालिकेनं आठवडाभरातच २३ लाखांचा दंड वसूल केला आहे. वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी हा नियम करण्यात आल्याचं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात येत आहे. त्यातच महापौर महाडेश्वर शनिवारी संध्याकाळी विलेपार्ले येथील एका हॉटेलात जेवायला गेले होते. कारमधून उतरून ते हॉटेलात गेले. चालकाने कार हॉटेलबाहेरच उभी केली होती. तिथं 'नो पार्किंग' असा फलक लावलेला होता. पालिका अवैध पार्किंगविरोधात कारवाई करत असताना महापौरांची कार 'नो पार्किंग'मध्ये पार्क झाल्याने सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. 

छायाचित्रं  व्हायरल 

महाडेश्वर यांची गाडी 'नो पार्किंग'मध्ये उभी असल्याची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर महापौरांवर कारवाई होणार का? असा सवाल सर्व स्तरातून करण्यात आला. अखेर मुंबई वाहतूक पोलिसांनी महाडेश्वर यांना ई-चलान पाठवलं आहे.हेही वाचा -

दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांच निधन

आयपीएलविरोधात दाखल जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळलीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा