Advertisement

79 व्या वर्षी "रोमान्स स्कॅम" वरील ओळख वृद्धाला महागात पडली

सीमाशुल्क विभागाच्या लेटरहेडवर असल्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीने कोणताही संशय व्यक्त न करता ती रक्कम भरली.

79 व्या वर्षी "रोमान्स स्कॅम" वरील ओळख वृद्धाला महागात पडली
SHARES
Advertisement


सोशल मिडियावरील ओळखितून प्रेमात आंधळे झालेले अनेक तरुण प्रेयसिसाठी कुठल्याही थराला जातात हे आतापर्यंत ऐकले होते. माञ मुलुंडमध्ये 79 वर्षीय वृद्धाने प्रेमात आपल्या आयुष्याची जमा पूंजी, मृत पत्नीचे दागिने विकले. ऐवढेच काय तर तो वृद्ध त्या परदेशी महिलेसाठी चक्क स्वत:चे घर ही विकायला निघाला होता. माञ ही बाब मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्याने वडिलांची होत असलेली फसवणूक त्यांच्या लक्षात आणून देत मुुलुंड पोलिसात धाव घेतली.


मुलुंड परिसरात राहणाऱ्या 79 वर्षीय पूर्वी अभियंता म्हणून एका नामकिंत कंपनीत कामाला होता. मे महिन्यात त्याची ओळख युरोपीयन समाज माध्यमांवर एका 41 वर्षीय विधवेशी झाली. पतीच्या मृत्यूनंतर ही महिला दोन मुलांचा सांभाळ करत असल्याचे सांगत, ही महिला रेड क्रॉस या संयुक्त राष्ट्राशी संलग्न असलेल्या संस्थेत काम करत असल्याचे तिने सांगितले. कालांतराने दोघांनी एकमेकांशी व्हाँट्स अँप नंबर शेअर करत बोलणे सुरू ठेवले. जूनमध्ये या महिलेने आपण लॅपटॉप, मोबाईल व दागिने पाठवत असल्याचे फसवणूक झालेल्या व्यक्तीला सांगितले. त्याने ते स्विकारण्यास नकार दिला असता, मुंबईतील अनाथाश्रमांना देता येईल, असे तिने सुचवले. त्यानंतर जुलै महिन्यात राधिका शर्मा नावाच्या महिलेचा तक्रारदाराला दूरध्वनी आला. तिने आपण दिल्ली सीमाशुल्क विभागातून बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाने आलेल्या गिफ्टमध्ये परदेशी चलन आहे. त्यामुळे सीमाशुल्काच्या नावाखाली 50 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. सीमाशुल्क विभागाच्या लेटरहेडवर असल्यामुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीने कोणताही संशय व्यक्त न करता ती रक्कम भरली. 


याच दरम्यान ती विवाहिता वृद्धाला भेटायला भारतात त्याला न सांगता आली असता. तिच्याजवळ मोठ्या प्रमाणात पैसे असल्याने सीमा शुल्क विभागाने तिला अटक केल्याचे वृद्धाला फोनवर कळवण्यात आले. त्यावेळी विवाहितेला सोडवण्यासाठी तक्रारदार धडपड करू लागले. त्यावेळी सीमाशुल्क विभागाचे अधिकारी बोलत फोनवर असल्याचे भासवून सुटकेसाठी अनेकदा वृदधाकडून पैस उकळ्यात आले. महिलेच्या सुटकेसाठी आयुष्यभराची जमापुंजी त्या वृद्धाने लुटवली. ऐवढेच नव्हे तर मृत पत्नीचे दागिने ही मोडून ते खर्च केले. माञ तरी ही वेगवेगळी कारण सांगून हे भामटे वृद्धाकडून पैसे उकळू पहात होते. अखेर महिलेच्या सुटकेसाठी वृद्घाने टोकाचे पाऊल उचलत घर विकण्यासाठी  काढले.

 त्याबाबत नातेवाईकांकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यानंतर एका नातेवाईकांना अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या त्यांच्या मुलाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुलगा परदेशातून घरी आला व त्याने वडिलांना घर विकण्या मागचे कारण विचारले. त्यावेळी त्याने वडिलांचा मोबाईल तपासला असता त्यांची फसवणूक झाल्याचे मुलाच्या लक्षात आले. त्यानंतर मुलाने स्वतः मुलुंड पोलिस ठाण्यात येऊन याप्रकरणी तक्रार केली. 
संबंधित विषय
Advertisement