कोरोनाने मृत झालेल्यांची चौकशी करू नका - गृहमंञ्यांचे आदेश


कोरोनाने मृत झालेल्यांची चौकशी करू नका - गृहमंञ्यांचे आदेश
SHARES
कोरोना  पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल  झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी केली जात होती, माञ आधीच प्रसंग ओढवलेल्या व्यक्तीला पून्हा पोलिसांच्या दारात हेलपाटे मारावे लागत असल्याने पोलिसांकडून चौकशी न करण्याच्या सूचना गृहमंञ्यांनी दिल्या आहेत.

कोरोनाने देशभरात थैमान घातला आहे. कोरोना बाधीत रुग्णांमध्ये महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानी आहे. अनेकदा प्रशासनाकडून सांगून सुद्धा नागरिक काही गर्दी करणे थांबवत नाही. अशानेच महाराष्ट्रात कोरोनाचा फैलैव दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्या मृत व्यक्तीची पून्हा पोलिस, डाँक्टर, नर्स यांच्या मार्फत चौकशी केली जात होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर Inquest च्या वेळी डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा, नर्सेस ,तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता आहे.  त्यामुळे  शासनाने मृत व्यक्तीची पून्ही चौकशी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

      साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील भाग 2 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी अन्वय राज्यामध्ये निर्बंध असेपर्यंत  हे आदेश लागू असणार आहेत . गृहविभागाने नुकतेच या बाबत एक परिपत्रक  काढले असून त्याचा संकेतांक २०२००४०८१३४६४०९८२९असा आहे . शासनाच्या याwww.maharashtra.gov.in संकेतस्थळावर हे परिपत्रक उपलब्ध आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा