पाच कुख्यात आरोपींचे पुण्याच्या येरवडा जेलमधून पलायन

कारागृहात कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव वेगवेगळ्या इमारतीत हलवण्यात आले होते.

पाच कुख्यात आरोपींचे पुण्याच्या येरवडा जेलमधून पलायन
SHARES

पुण्याच्या येरवडा कारागृहातून पाच कुख्यात आरोपींनी पलायन केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण, अंजिक्य उत्तम कांबळे, सनी टायरन पिंटो अशी या आरोपींची नावे आहेत. हे पाच ही आरोपी पुण्याचेच असल्याचे सांगण्यात आले आहे. यातील तीन कैदी मोक्का अंतर्गत अटकेत होते.

हेही वाचाः- पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना. आता हा कोरोना कारागृहापर्यंत पोहचला होता. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कारागृहात कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव वेगवेगळ्या इमारतीत हलवण्यात आले होते. त्याच प्रमाणे या पाच कैद्यांची कारागृहातील इमारत क्रमांक ४ पहिल्यामाळ्यावर रुम नं ५  मध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी आरोपींनी त्या इमारतीच्या खिडक्यांचे गंज कापून पळ काढला. यातील देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश अजिनाथ चव्हाण, अक्षय कोंडक्या चव्हाण हे तीन आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली होती.

हेही वाचाः- मुसळधार पावसाने मुंबईचे केले ‘इतके’ नुकसान

कारागृह प्रशासनाने कोरोनाच्या पाश्वभूमिवर आतापर्यंत ११ हजार कैद्यांना जामीनावर सोडले होते. मात्र या आरोपींवर असलेले गंभीर गुन्ह्यांची नोंद लक्षात घेता. यांना जामीनानृवर सोडणे हे धोकादायक असल्याने यांना कारागृहातील इमारतीतच ठेवले होते. सध्या या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून सदर आरोपींचा आप-आपल्या पोलीस ठाण्याचे हद्दीत शोध घेऊन मिळून आल्यास त्यांना ताब्यात घेऊन येरवडा पोलीस ठाण्यास अवगत करावे असे आवाहन येरवडा कारागृह प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा