महिलेचे अश्लील फोटो सोशल मिडियावर टाकणाऱ्यास दोन वर्षानंतर अटक

२०१५ मध्ये दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघे रिलेशनमध्ये असताना. महिलेचे काही अश्लील फोटो आरोपीकडे होते.

SHARE

मुंबईतील गोरेगाव परिसरात राहणाऱ्या महिलेचे अश्लील फोटो टाकणाऱ्या आरोपीस पोलिसांनी दोन वर्षानंतर अटक केली आहे. परदेशातून त्याने ते फोटो सोशल मिडियावर टाकले होते. याबाबत महिलेने गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. आरोपी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

गोरेगाव परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय महिला २०१३ मध्ये भावासोबत एका कार्यक्रमात गेली असताना. तिथे भावाने तिची ओळख आरोपीसोबत करून दिली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीचे संबध होते. २०१५ मध्ये दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघे रिलेशनमध्ये असताना. महिलेचे काही अश्लील फोटो आरोपीकडे होते. त्याने पैशांसाठी तिला ब्लॅकमेल सुरू केले. त्यावेळी महिलेने पोलिसांत जाण्याची धमकी दिल्यानंतर आरोपीने परदेशात पळ काढला. त्यानंतर परदेशातून जुलै २०१७ मध्ये त्याने ते फोटो सोशल मिडियावर अपलोड केले. याबाबतची माहिती महिलेच्या भावाने पीडितेला दिल्यानंतर तिने गोरेगाव पोलिसात तक्रार नोंदवली.

मात्र आरोपी दुबईत असल्यामुळे तो पोलिसांच्या हाती येत नव्हता. मात्र पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. दरम्यान वर्षभरानंतर नुकताच आरोपी मुंबई विमानतळावर आला असताना. इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या