मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गाडीचा नवीमुंबई येथे अपघात

शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाली असून अपघातानंतर त्या दुसऱ्या गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गाडीचा नवीमुंबई येथे अपघात
SHARES
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्य पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गाडीचा नवी मुंबई येथे शनिवारी दुपारी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात शर्मिला ठाकरे थोडक्यात बचावल्या असून त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, शर्मिला ठाकरे यांना दुसऱ्या गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना केले आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला नवी मुंबईतील तुर्भेजवळ काही वेळापूर्वीच अपघात झाला असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. हा अपघात प्रचंड भीषण होता. पण सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाली असून अपघातानंतर त्या दुसऱ्या गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. 

ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला. नवी मुंबईतील सानपाड्याजवळ अचानक समोर आलेल्या एका ऑटोला चुकवताना चालकानं गाडीचा ब्रेक लावला. त्याचवेळी मागून आलेल्या गाडीनं शर्मिला यांच्या कारला धडक दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कारमध्ये शर्मिला यांच्याबरोबरच राज यांची बहीण व सचिव सचिन मोरे हे होते. 

संबंधित विषय