दादरच्या (dadar) शिवाजी पार्कमध्ये काही लोकांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्यानंतर राजकीय तणाव निर्माण झाला. हा पुतळा शिवाजी पार्क उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या (uddhav thackeray) पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रंग काढून टाकला. ही घटना पहाटे घडली. दुपारपर्यंत शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मीनाताईंच्या पुतळ्याची साफसफाई केल्यानंतर त्यावर हार घालली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, उद्यानात 24/7 सुरक्षा रक्षक नेहमीच तैनात असतात त्यामुळे ही विकृत घटना कशी काय घडली याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.
यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांनी मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) पुतळा परिसरात जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेतली. या परिसरात नेमके काय घडलं आणि आतापर्यंत पोलिसांकडून (Police) काय कारवाई करण्यात आली हे देखील त्यांनी जाणून घेतले. त्यानंतर 24 तासांच्या आत पुतळ्यावर रंग टाकणाऱ्याला शोधा अशी विनंती राज ठाकरेंनी पोलिसांना केली.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शाखाप्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भेट देणार आहेत. तसेच त्यांनी स्थानिक पदाधिकार्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची माहिती घेतली आहे.
हेही वाचा