COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

दाऊदच्या मुंबईतील अखेरच्या संपत्तीचा लिलाव

मुंबईच्या १९९३ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमच्या एका मागोमाग एक संपत्तीचा लिलाव करण्यास केंद्र सरकारने सुरूवात केली आहे. ९३ च्या स्फोटानंतर सरकारने दाऊदच्या एकूण १० मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यातील महत्वाच्या ३ मालमत्ता नोव्हेंबर महिन्यात लिलाव झाला होता.

दाऊदच्या मुंबईतील अखेरच्या संपत्तीचा लिलाव
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतल्या अमिना मेन्शन या शेवटच्या इमारतीचा लिलाव गुरूवारी झाला. दक्षिण मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी असलेली ही इमारत ३. ५१ कोटी रुपयांना विकण्यात आली. दाऊदची या पूर्वीची मालमत्ता विकत घेणाऱ्या सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीएटी)नेच ही मालमत्ता विकत घेतली. केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने 'सफेमा कायद्यां'तर्गत दाऊदच्या या मालमत्तेचा लिलाव केला.


३ मालमत्तांचा आधीच लिलाव

मुंबईच्या १९९३ मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमच्या एका मागोमाग एक संपत्तीचा लिलाव करण्यास केंद्र सरकारने सुरूवात केली आहे. ९३ च्या स्फोटानंतर सरकारने दाऊदच्या एकूण १० मालमत्ता जप्त केल्या होत्या. त्यातील महत्वाच्या ३ मालमत्ता नोव्हेंबर महिन्यात लिलाव झाला होता.त्यामध्ये रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस यांचा समावेश होता. या लिलावात रौनक अफरोझ हॉटेलसाठी ४.५३ कोटी रुपये, शबनम गेस्ट हाऊससाठी ३.५३ कोटी रुपये आणि डांबरवाला इमारतीसाठी ३.५३ कोटी रुपये एवढी बोली लावण्यात आली होती. ११.५० कोटीला सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने विकत घेतली.


कधी झाला लिलाव?

त्यानंतर पाकमोडिया इस्टेटवरील अमीना मेन्शन बिल्डिंग ही दाऊदची शेवटची मालमत्ता उरली होती. केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने सफेमा (स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स) कायद्या अंतर्गत या मालमत्तेचा लिलाव यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ च्या सुमारास केला.


इमारतीला आईचं नाव

अमिना मेन्शन इमारतीचे पूर्वीचे नाव मसूला असं होतं. मात्र दाऊदने ही इमारत खरेदी केल्यानंतर या इमारतीला त्याने त्याची आई अमिनाचं नाव दिलं. या लिलावात सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने सर्वाधिक बोली लावत ही इमारत ही इमारत ३. ५१ कोटींना विकत घेतली.हेही वाचा-

इक्बाल कासकरची पुन्हा तुरुंगात रवानगी

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला दुबईत अटकRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा