Advertisement

महेश मांजरेकर लवकरच घेऊन येत आहेत बिग बॉस सिजन ३

नुकतीच ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महेश मांजरेकर लवकरच घेऊन येत आहेत बिग बॉस सिजन ३
SHARES

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रियालिटी शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’चे दोन्ही पर्व प्रचंड गाजल्यानंतर आता प्रेक्षक याच्या तिसऱ्या पर्वाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची ही प्रतिक्ष संपली आहे. लवकरच बिग बॉस ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतीच ‘बिग बॉस मराठी ३’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कलर्स मराठीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत बिग बॉस मराठी ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं आहे. दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठी ३वर’ असं कॅप्शन दिलं आहे.

तसंच ‘बिग बॉस मराठी ३’ संदर्भात अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील एक ट्वीट केलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये ‘त्यांच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार रहा’ असं म्हटलं आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३’चे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ३’च्या यंदाच्या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार, घरात कोणते टास्क रंगणार आणि यंदाच्या पर्वात नेमके काय होणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

१५ एप्रिल २०१८ रोजी ‘बिग बॉस मराठी’चे पहिले पर्व पार पडले. अभिनेत्री मेघा धाडे या पर्वामध्ये विजयी ठरल्यानंतर पर्व संपत नाही तोपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला दुसरं पर्व देखील आले. शिव ठाकरेनं यापर्वामध्ये ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा