Advertisement

DDLJ तील राज आणि सिमरनचा परदेशात उभारला जाणार कांस्य पुतळा

२० ऑक्टोबर १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आता आणखी एक इतिहास घडवला आहे. चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण होत असल्यानं लंडनमध्ये शाहरुख आणि काजोल

DDLJ तील राज आणि सिमरनचा परदेशात उभारला जाणार कांस्य पुतळा
SHARES

९०च्या दशकातील ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाच्या रिलीजला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यानं अनेक विक्रम केले आहेत. २० ऑक्टोबर १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं आता आणखी एक इतिहास घडवला आहे.

चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण होत असल्यानं लंडनमध्ये शाहरुख आणि काजोल अर्थातच प्रेक्षकांच्या लाडक्या राज आणि सिमरनचा कांस्य पुतळा बसवला जाणार आहे. लंडनमध्ये बॉलिवूड चित्रपटातील पात्रांचा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याबाबतची माहिती देताना ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी लिहिलं आहे की, पुढील वर्षी वसंत ऋतूमध्ये शाहरुख आणि काजोल यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण केलं जाईल. यामध्ये चित्रपटातील एक दृश्य रिक्रिएट केलं जाणार आहे. लंडनच्या लिसेस्टर स्क्वेअरमध्ये सीन इन द स्क्वेअर म्हणून हा पुतळा स्थापित केला जाणार आहे.

२० ऑक्टोबर १९९५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाद्वारे आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होते. यशराज फिल्म्सच्या अधिकृत वेबसाईटनुसार, चित्रपटाची निर्मिती 4 कोटी रुपयांत करण्यात आली होती आणि त्यावेळी भारतात या चित्रपटानं ८९ कोटी आणि परदेशात १३.५० कोटी रुपये कमावले होते.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा