कोरोनाव्हायरस जगभरात विनाश आणत आहे. भारतात गेल्या 6 महिन्यांपासून हा आजार पसरला आहे. काही राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी झाली आहेत.
पण महाराष्ट्रात कोरोनाची तीव्रता वाढत आहे. मुंबई आणि मुंबईला लागून उपनगरामध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. कंटेनमेंट झोनमध्ये ३१ सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन सुरू आहे.
तसंच, घराबाहेर पडताच लोकांना फेस मास्क घालणं बंधनकारक आहे. परंतु असं दिसून आलं आहे की, लोकं मास्क घालत नाहीत. मास्क नीट न घालणं, वारंवार मास्कला हात लावणं, मास्कनं तोंड न झाकणं अशा मोठ्या चुका करात आहेत. लोकांचं हेच वागणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे कोरोना सारखा आजार आणखी पसरू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेने मास्कबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. ज्यामध्ये लोकांना असं सांगितलं गेलं आहे की आपण मास्क घालताना काय चुका करता आणि त्या टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे.
अनेकदा असं दिसून आलं आहे की, लोक एकमेकांशी बोलत असताना चेहऱ्यावरील मास्क काढून टाकतात. ज्यामुळे कोरोना संक्रमण होण्यास मदत होते. हे करणं टाळा. मास्क पूर्ण घाला. यामध्ये तुमचं नाक आणि तोंड झाकलं गोलं पाहिजे.
मास्क परिधान करताना हे लक्षात ठेवावं की, मास्क एखाद्या व्यक्तीनं चेहऱ्यावर व्यवस्थित मास्क घातलं आहे. जर मास्कमध्ये गॅम म्हणजे नाकाच्या बाजून किंवा खालच्या बाजूनं मास्क ढिल पडल्यानं जराशी जागा देखील असेल तर त्यातून कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका वाढतो.
बहुतेक लोक ही चूक करतात. मास्क घातल्यानंतर लोकं वारंवार त्याला हात लावतात. ही एक चुकीची सवय आहे. असं केल्यानं आपण मास्क घालण्याच्या मुख्य हेतूलाच तडा देतो. एकदा मास्क घाला आणि घरी पोहोचल्यानंतरच तो काढा. त्याला वारंवार हात लावू नका.
व्यक्ती नाकातून श्वासोच्छ्वास करतो. त्यामुळे मास्क घालताना हे लक्षात ठेवा की, आपलं नाक आणि तोंड दोन्ही झाकलेलं असावं. परंतु बरेच लोक मास्क घालताना फक्त तोंडावर मास्क घालतात. ना उघडं ठेवतात. ही पद्धत चुकिची आहे.
कुटुंबात राहणारे लोक एकमेकांचे मास्क वापरतात. ही एक वाईट सवय आहे. कारण यामुळे कुटुंबात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता वाढते. ५० टक्के पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये, कोरोनाची लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत नाहीत. वरुन ते निरोगी दिसतात. पण त्यांना कोरोना असेल तर मास्क स्वॅपिंगमुळे व्हायरस पसरतो.