Advertisement

खोपोलीत भारतातील पहिले आयुर्वेदिक कर्करोग रुग्णालय

खारघरमधील अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च आणि एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC) केंद्रापासून ते सुमारे 30-40 मिनिटांच्या अंतरावर असेल.

खोपोलीत भारतातील पहिले आयुर्वेदिक कर्करोग रुग्णालय
SHARES

टाटा मेमोरीअल हॉस्पीटल लवकरच खोपोली येथे कॅन्सरवर आयुर्वेदीक उपचार करणारे देशातील पहिले रुग्णालय सुरु करणार आहे. हे रुग्णालय 20 एकर जमिनीवर 100 बेड असलेले सुसज्ज रुग्णालय असणार आहे. इथे कर्करोगावरील आयुर्वेदिक उपचारांच्या शोधासाठी संशोधनाचे केंद्रही असणार आहे. मार्च 2026 पर्यंत रुग्णालय आणि रिसर्च सेंटरचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

कर्करोग झालेल्या रुग्णासह त्याच्या कुटुंबावर आर्थिक भार येतो तसेच याचे दीर्घकाळ दुष्परीणामही सहन करावे लागतात. ही बाब अधोरेखित करत कर्करोगतज्ज्ञ डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले की, आमचा कल आयुर्वेदीक उपचारपद्धतीकडे असून या उपचार पद्धतीने कर्करोगावर उपचार होतील.

कर्करोग व्यवस्थापन एक आव्हान आहे. त्याचे दीर्घकाळ दुष्परिणामही असतात. या पद्धतीच्या उपचाराने प्रतिकारशक्ती वाढवणे, हा आजार पुन्हा उद्भवू नये यासाठी संशोधन करणे गरजेचे आहे. असे डॉ.चतुर्वेदी यांनी सांगितले.

‘कर्करोग व्यवस्थापनातील आयुर्वेद’ असे शीर्षक असलेल्या अहवालात, सदाबहारच्या सिंगल ड्रग थेरपीमध्ये अँण्टी ऑक्सिडेंटिव्ह आणि कर्करोगविरोधी गुणधर्मांवर प्रकाश टाकला आहे. या वनस्पतीमध्ये व्हिन्क्रिस्टिन आणि विनब्लास्टाईन हे प्रमुख कर्करोगविरोधी घटक आहेत. याचबरोबर तुळशीची पानं कर्करोगावर इलाजासाठी उपयुक्त ठरत आहेत.

तुळशीच्या पानांचा अर्क मानवी कर्करोगाविरोधात प्रभावी ठरत आहे. रसायन चूर्ण, ज्यामध्ये अमलाकीचाही समावेश आहे त्याच्या अँटीऑक्सीडेटिव्ह गुणधर्मांमुळे, कर्करोगाच्या उपचारात फरक दिसून येत आहे. आयुर्वेदाचा उपयोग कर्करोगावर सहायक उपचार म्हणून केला जातो. त्यामुळे आयुर्वेद उपचारपद्धती कर्करोगाशी लढा देण्यासाठी वरदान ठरू शकते.

अलिकडे नोनी कॅप्सूलचा वापर सहायक औषध म्हणून केला जातो ज्यामध्ये नोनी हा मुख्य घटक आहे आणि स्कोपोलॅटिनसारख्या अल्कलॉइडमध्ये अँटी-ऑक्सिडेण्ट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. 

आयुर्वेदीक उपचारपद्धधतीबाबत डॉ.चतुर्वेदी म्हणतात की, आयुर्वेदाकडे फार्मा कंपन्या या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. नवीन रुग्णालय आणि संशोधन केंद्राची भूमिका ही आयुर्वेदिक औषधे कर्करोगाच्या उपचारात खरोखर उपयुक्त आहेत की नाही हे संशोधनानंतर कळेलच.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा