Advertisement

रोबोटकडून हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया, ५६ वर्षीय व्यक्तीला जीवनदान

या कार्यक्रमाचे नेतृत्व डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, वरिष्ठ सल्लागार CVTS आणि ग्लोबल हॉस्पिटल, परळ येथील लीड हार्ट ट्रान्सप्लांट सर्जननी केले.

रोबोटकडून हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया, ५६ वर्षीय व्यक्तीला जीवनदान
SHARES

परेल येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये रोबोटिक-असिस्‍टेड सर्जरी (आरएएस) सिस्टिमचा वापर करून यशस्‍वीपणे हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रोबोटिक असेस्टेड कार्डियाक सर्जरी सिस्टिमद्वारे बायपास शस्त्रक्रिया करत कल्याणमधील ५६ वर्षीय रुग्णाला नवे जीवदान मिळाले आहे.

बी. के. साहा यांना छातीत वेदना होणे आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. अँजिओग्राफीद्वारे ट्रिपल वेसल आजाराचे निदान झाले, मात्र कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टसाठी पारंपारिक ओपन स्टर्नोटॉमीमुळे शस्त्रक्रियेनंतर जखमा बरे होण्यास विलंब होण्याचा धोका होता. तसेच रोबोटिक-असिस्टेड कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टच्या फायद्यांबद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी ग्लोबल हॉस्पिटलची शस्त्रक्रियेसाठी निवड केली.

अत्याधुनिक ‘दा विंची सर्जिकल सिस्टीम’ने सुसज्ज असा रोबोट-असिस्टेड हार्ट सर्जरी विभाग आहे. हे तंत्रज्ञान शल्यचिकित्सकांना पारंपरिक ओपन-हार्ट शस्त्रक्रियांपेक्षा अधिक अचूक आणि गुंतागुंतीच्या हृदयासंबंधीत शस्त्रक्रिया करण्यास फायदेशीर ठरले.

लहान छेद करून, रक्तस्राव कमी करण्यावर भर देण्यात आला. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना वेदनाही कमी होतात. रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर हा संक्रमणाचा धोका कमी करण्यास आणि हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी कमी करण्यास मदत करतो. “रोबोटिक असिस्टेड हार्ट सर्जरी हा हृदय शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील एक नावीण्यपूर्ण शोध आहे,” असे डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी (वरिष्ठ सल्लागार सीव्हीटीएस आणि ग्लोबल हॉस्पिटलचे प्रमुख फुफ्फुस प्रत्यारोपण सर्जन) यांनी सांगितले.

या प्रक्रियेदरम्यान सर्जन ऑपरेटिंग रूममधील कन्सोलमधून विशेष साधनांचा वापर करून रोबोटिक शस्त्रे हाताळतात. रोबोटचे प्रगत तंत्रज्ञान, अचूकता आणि उत्तम परिणाम देते. त्यामुळे हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेसारख्या नाजूक हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांसाठी हा उत्तम पर्याय होता.

याव्यतिरिक्त या प्रणालीमध्ये त्रि-आयामी इमेजिंग तंत्रज्ञान समाविष्ट असल्याने आजूबाजूच्या नाजूक ऊतींचे फारसे नुकसान झाले नाही. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि रोबोटिक असिस्टेड हार्ट सर्जरी केल्याने लक्षणीय सुधारणा होत असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.



हेही वाचा

मुंबईत डेंग्यु आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये होतेय वाढ

केईएममध्ये हिमोफिलिया रुग्णांना एकाच छताखाली उपचार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा