Advertisement

गोखले पुल खुला होण्याचा मुहूर्त पुन्हा हुकला

यापूर्वी मे महिन्यापर्यंत गोखले पूल खुला केला जाणार होता.

गोखले पुल खुला होण्याचा मुहूर्त पुन्हा हुकला
SHARES

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपूल खुला करण्याची अंतिम मुदत पुन्हा हुकणार आहे. यापूर्वी मे महिन्यापर्यंत गोखले पूल खुला केला जाणार होता.

मात्र मुंबई महापालिकेकडून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत उड्डाणपूल खुला केला जाणार आहे. मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (पूल विभाग) वेलरासू आणि अन्य पालिका अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली.

गोखले उड्डाणपुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वे, तर पुलाची पुनर्बांधणी मुंबई महापालिका करत आहे. पूल पुनर्बांधणीचे काम मे २०२३पर्यंत पूर्ण करून किमान एक मार्गिका सुरू करण्याचा प्रयत्न होता. या पुलाच्या आरेखनाला पश्चिम रेल्वेने २ फेब्रुवारीला मंजुरी दिली. या स्टील उपकरणांसाठी दोन उत्पादक आहेत.

यातील एका उत्पादकाच्या प्लाण्टमध्ये अचानक अनिश्चित काळासाठी संप झाल्याने पुलासाठी लागणारे गर्डर आणि अन्य साहित्य पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे एप्रिल अखेरीस पुरवठ्याला सुरुवात होणार आहे. याचा परिणाम पुलाच्या पुनर्बांधणीवर झाला आहे.

१५ जुलैनंतर रेल्वे हद्दीतील भाग पूर्ण करणे आणि अन्य कामांसाठी तीन महिन्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे हा पूल दिवाळीच्या मध्यापर्यंत पालिकेकडून खुला करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

मे महिन्यात सुरू होणाऱ्या पुलाला पाच महिने विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा