Advertisement

हे लोकांसाठीचे बजेट असेल जुमला बजेट नसेल - किशोरी पेडणेकर

आगामी निवडणूका पाहता त्यासाठी शिवसेना सज्ज आहे आणि आम्ही ही निवडणूक देखील जिंकू असा विश्वासही किशोरी पेडणेकर यांनी बोलून दाखवला आहे.

हे लोकांसाठीचे बजेट असेल जुमला बजेट नसेल - किशोरी पेडणेकर
SHARES

मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प उद्या म्हणजे ३ फेब्रुवारी रोजी सादर करणार आहेत. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे बजेट लोकांसाठी असेल, जुमला बजेट नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

आगामी निवडणूका पाहता त्यासाठी शिवसेना सज्ज आहे आणि आम्ही ही निवडणूक देखील जिंकू असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.

याआधी, अहवालात असं म्हटलं आहे की, BMC बजेटसाठी खर्च अंदाजे ७-८ टक्क्यांनी वाढेल आणि ४०,००० कोटी पार करेल. कोणताही नवीन कर प्रस्तावित होण्याची शक्यता नसल्याचाही अंदाज बांधला जात आहे.

तरीही, पाणी आणि इतर सेवांच्या शुल्कात किंचित वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, आरोग्यसेवा, पायाभूत सुविधा आणि शिक्षणाला चालना मिळू शकते. 

शिवाय, अलीकडेचपालिकेनं मुंबईतील २३६ निवडणूक प्रभागांचे सीमांकन हायलाइट करणारा तपशीलवार नकाशा जारी केला आहे. नऊ नवीन वॉर्ड आले आहेत. 

दरम्यान, अर्थसंकल्पाबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि गरिबांना काय मिळाले? बजेट गोंधळात टाकणारे, 'जुमला', 'गोलमाल' आणि टाइमपास होते, तो एक फ्लॉप चित्रपट आहे.

BMC ही देशातील सर्वात श्रीमंत नगरपालिका आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पालिकेनं एकूण ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. जे मागील वर्षीच्या तुलनेत १६ टक्के अधिक होते. पालिकेचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक निधीचे बजेट होते. यापूर्वी २०१९-२० या आर्थिक वर्षात पालिकेनं ३३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता.



हेही वाचा

युतीच्या चर्चेत पडू नका, निवडणुकीच्या तयारीला लागा - राज ठाकरे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा