लग्नास नकार दिल्याने महिलेची बदनामी करणाऱ्यास अटक

यादवने महिलेचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. तिचे फोटो अपलोड करून त्या खाली अश्लील पोस्ट करण्यास सुरूवात केली. ही बाब महिलेच्या मित्रांनी आणि घरातल्यांनी तिला दिल्यानंतर तिने याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली.

लग्नास नकार दिल्याने महिलेची बदनामी करणाऱ्यास अटक
SHARES

लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर महिलेने लग्न करण्यास नकार दिला.  त्या रागातून बनावट फेसबुक तयार करून महिलेची बदनामी करणाऱ्या केतन हरीलाल यादव (५३) या व्यक्तीस ना.म.जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. यादव बोरीवली पूर्व येथील रहिवासी आहे.


घरी नेण्यास टाळाटाळ

चिंचपोकळी येथे राहणाऱ्या महिलेने लग्न जुळवण्याच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्या संकेतस्थळावर तिची ओळख यादवसोबत  झाली. यादवने तो नवी मुंबई परिसरात राहतो असं सांगून लग्नाची मागणी घातली. त्यानुसार महिलेने यादवला त्याच्या घरी कुटुंबियांना भेटण्यासाठी येणार असल्याचं सांगितल्यानंतर त्याने गेस्ट हाऊसवर भेटायला बोलावलं. त्या भेटीत त्याने आपण नवी मुंबईतील खोली विकली असं सांगत, पामबिचवर नवीन घर घेतल्याचं सांगितलं. मात्र वेळोवेळी यादव त्याच्या राहत्या घरी नेण्यास टाळाटाळ करत असल्याने मुलीने त्याला लग्नाला नकार दिला.


अश्लील पोस्ट

याचाच राग म्हणून यादवने महिलेचे बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. तिचे फोटो अपलोड करून त्या खाली अश्लील पोस्ट करण्यास सुरूवात केली.  ही बाब महिलेच्या मित्रांनी आणि घरातल्यांनी तिला दिल्यानंतर तिने याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास केला असता. आरोपी हा वसईतील एका विश्रामगृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला रविवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याजवळून तीन मोबाइल हस्तगत केले आहेत.



हेही वाचा -

पबमध्ये विवाहितेशी गैरकृत्य, गुजरातमधील ४ व्यावसायिकांना अटक

विवाहितेचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा