विवाहितेचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास अटक

लोकलमध्ये विवाहितेचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अफजल जलालुद्दीन सय्यद असे या आरोपीचं नाव आहे.

विवाहितेचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास अटक
SHARES

लोकलमध्ये विवाहितेचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अफजल जलालुद्दीन सय्यद असं या आरोपीचं नाव आहे. मागील अनेक दिवसांपासून हा विवाहितेचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. 


विवाहितेची तक्रार

नवी मुंबईच्या नेरूळ परिसरात राहणारी २२ वर्षीय विवाहिता आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी डाॅकयार्ड परिसरात जात होत्या. विवाहिता राहत असलेल्या ठिकाणी अफजल हा कामाला होता. तसंच त्याची विवाहितेवर अनेक दिवसांपासून वाईट नजर होती. दरम्यान, ३ मार्च रोजी विवाहिता या त्याच्या मैत्रिणीकडे जाण्यासाठी निघाल्या असताना अफजलने त्यांचा पाठलाग केला असल्याचं सदर विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसंच त्यानंतरही त्याने दोनवेळा पाठलाग केल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.


पीडितेकडून समज

दरम्यान, ८ मार्च रोजी पीडित महिला या मैत्रीणीसह लोकलच्या जनरल डब्यातून प्रवास करत असताना अफजल त्यांच्या शेजारी येऊन बसला. तसंच महिलेला अनुसरून अश्लील गोष्टी बोलू लागला. त्यावेळी पीडितेने त्याला समज दिल्यानंतर ही अफजल त्रास देत असल्यामुळे पीडित विवाहितेने अखेर वडाळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.




हेही वाचा -

खात्री न करता मोबाइल विकणं पडलं महागात

बेस्टच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा