Advertisement

बेस्टच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय

बेस्टने भंगारात काढलेल्या बसगाड्यांमध्ये आता फिरते शौचालय उभारण्यात येणार आहे. याबाबत शिवसेनेने मागणी केली होती. शिवसेनेच्या या मागणीला पालिकेच्या महासभेत बहुमतामे मंजूरी देण्यात आली आहे.

बेस्टच्या भंगारातील बसगाड्यांमध्ये उभारणार शौचालय
SHARES

'बेस्ट'ने भंगारात काढलेल्या बसगाड्यांमध्ये आता फिरते शौचालय उभारण्यात येणार आहेत. याबाबत शिवसेनेने मागणी केली होती. शिवसेनेच्या या मागणीला पालिकेच्या महासभेत बहुमतामे मंजूरी देण्यात आली आहे. फिरत्या शौचालयाची सुविधा मुंबईकरांसाठी मुंबईतील महामार्ग, छोटे रस्ते, गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिक-प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.


फिरत्या शौचालयाची मागणी

मुंबईत सध्या ठिकठीकाणी मोनो आणि मेट्रो रेल्वेचे खोदकाम, रस्त्यांची, पुलांची कामे, फेरीवाले यांच्या अडथळ्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी निर्माण होत आहे. तसंच, पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावर सार्वजनिक शौचालयांची सोय नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिक व मधुमेहाच्या रुग्णांची प्रचंड गैरसोय होते. त्यांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या भंगारात काढण्यात आलेल्या बसगाड्यांमध्ये फिरतं शौचालय उभारण्याची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर बेस्टच्या भंगार गाड्यांमध्ये शौचालय सुरू करून ही सुविधा असलेली वाहने गर्दीच्या ठिकाणी आणि मागणीनुसार उभी करावी, अशा मागणीच्या ठरावाची सुचना शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी मांडली होती.


शौचालयाच्या प्रस्तावाला रवी राजांचा विरोध 

दरम्यान, बेस्ट उपक्रम ही मुंबईची विशिष्ट ओळख असल्यामुळे बेस्टच्या भंगार बसगाड्यांचा शौचालयासाठी वापर करण्याचा प्रस्तावाला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विरोध केला होता. तसंच, पालिका किंवा एमएमआरडीए यांनी मेट्रो रेल्वेजवळ शौचालये उभारावी, बेस्टच्या जुन्या बसगाड्यांचा वापर शौचालयांसाठी करू नये, अशी विनंती रवी राजा यांनी केली. तसंच बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पोलिसांनी आपल्या व्हॅनचे स्वच्छतागृहात रूपांतर केले आहे. याच पार्श्वभूमीवर बेस्ट उपक्रमाने भंगारात काढलेल्या काही बसगाड्यांचे फिरत्या शौचालयात रूपांतर करून महामार्ग, गर्दीच्या रस्त्यावर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. बेस्टच्या भंगार गाड्यांमध्ये शौचालय उभारताना गाड्यांवर बेस्टचा लोगो आणि रंगही राहणार नसल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी स्पष्ट केेले.



हेही वाचा -

मतदानासाठी यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर

दक्षिण मध्य मुंबईतून पुन्हा राहुल शेवाळे यांना उमेदवारी



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा