खात्री न करता मोबाइल विकणं पडलं महागात

गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात राहणारे शंकर सोनू केशव (३७) हे ५ सप्टेंबर २०१८ रोजी जुईनगर ते वाशी लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत खिशेकापूंनी त्यांचा मोबाइल चोरला.

खात्री न करता मोबाइल विकणं पडलं महागात
SHARES

खात्री न करता दुसऱ्या व्यक्तीकडून मोबाइल विकत घेऊन तिसऱ्या व्यक्तीला विकणं एका रिक्षा चालकाला महागात पडलं आहे. चौथ्या व्यक्तीला विकलेला मोबाइल हा चोराची असल्याने वाशी रेल्वे पोलिसांनी बशिर शमशूद्दीन शेख  (२३) या रिक्षा चालकाला अटक केली आहे.  त्यामुळेच अनोळखी व्यक्तीकडून कुठली ही खात्री न करता मोबाइल विकत घेताना सावधानगी बाळगा. कारण तो मोबाइल चोरीचाही असू शकतो. 


लोकलमध्ये मोबाइल चोरला

 गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात राहणारे शंकर सोनू केशव (३७) हे ५ सप्टेंबर २०१८ रोजी जुईनगर ते वाशी लोकलने प्रवास करत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत खिशेकापूंनी त्यांचा मोबाइल चोरला. याप्रकरणी केशव यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यांनी काही दिवस पाठपुरावाही केला. मात्र, मोबाइल मिळण्याची अपेक्षा नसल्यामुळे केशव यांनी पोलिस ठाण्याची पायपीठ थांबवली. तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र केशव यांचा मोबाइल ट्रेसिंगवर टाकला होता. दोन महिन्यांनी केशव यांचा चोरीला गेलेला मोबाइल गोवंडी येथे अॅक्टीव असल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी त्यावर फोन केला असता फोनवर मुशरफ मुक्तार शेख बोलत होते. पोलिसांनी मुशरफ यांच्याजवळ चौकशी करत त्यांना वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. 


रिक्षा चालकाकडून विक्री

मुशरफ काही दिवसांपूर्वी वाशी पोलिस ठाण्यात गेले. मुशरफ यांनी हा मोबाइल पाच महिन्यांपूर्वी बशिर शेख या रिक्षा चालकाकडून विकत घेतल्याचं सांगितलं. या व्यवहारात कुठलाही लेखी व्यवहार केला नसल्याचंही मुशरफ यांनी सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी बशिरला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यावेळी गोवंडी रेल्वे स्थानकाजवळ एका अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आला. त्याने हा महागडा मोबाइल अत्यंत कमी भावात विकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे मोबाइलचे बिल आणि कागद न पाहता हा मोबाइल विकत घेत, मुशरफ यांना जास्त पैशात विकल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी बशिरवर चोरीच्या मोबाइलची विक्री केल्याप्रकरणी भा.द.वीच्या ३८९,४११  कलमांतर्गत गुन्हा नोंदवत अटक केली आहे.  हेही वाचा - 

योगा प्रशिक्षक महिलेला अश्लील व्हिडिओ काॅल; तरूणास अटक

हसीना पारकरच्या घराचा होणार लिलाव
Read this story in हिंदी
संबंधित विषय