योगा प्रशिक्षक महिलेला अश्लील व्हिडिओ काॅल; तरूणास अटक

वरळी परिसरात राहणारी ४६ वर्षीय महिला ही प्रसिद्ध योगा प्रशिक्षक आहे. ही महिला दर महिन्याला त्याच परिसरातील स्मार्ट पार्लरमध्ये जायची. पार्लरमध्ये असताना ती तिचा मोबाइल कुठेही ठेवायची. याच पार्लरमध्ये आरोपी अबसर अहमद फउरकाम सलमानी काम करायचा. मागील अनेक दिवसांपासून त्याची पीडित महिलेवर वाईट नजर होती.

योगा प्रशिक्षक महिलेला अश्लील व्हिडिओ काॅल; तरूणास अटक
SHARES

वारंवार जाणाऱ्या ठिकाणी सहसा आपण आपला मोबाइल कुठेही विश्वासाने ठेवतो. पण हाच विश्वास वरळीतील एका महिला योगा टिचरला महागात पडला आहे.  नेहमीच्या पार्लरमध्ये जाणाऱ्या या टिचरचा मोबाइल नंबर मिळवत तेथील एका कर्मचाऱ्याने तिला व्हिडिओ काॅल करून त्रास देण्यास सुरूवात केली. रात्रीच्या वेळेस व्हिडीओ काॅल करून तो आपला चेहरा न दाखवता हस्तमैथून करतानाचा व्हिडीओ दाखवायचा. असे प्रकार अनेक वेळा झाल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अबसर अहमद फउरकाम सलमानी (२६) या तरुणाला अटक केली आहे. 


मोबाइल नंबर मिळवला

वरळी परिसरात राहणारी ४६ वर्षीय महिला ही प्रसिद्ध योगा प्रशिक्षक आहे. ही महिला दर महिन्याला त्याच परिसरातील स्मार्ट पार्लरमध्ये जायची. पार्लरमध्ये असताना ती तिचा मोबाइल कुठेही ठेवायची. याच पार्लरमध्ये आरोपी अबसर अहमद फउरकाम सलमानी काम करायचा. मागील अनेक दिवसांपासून त्याची पीडित महिलेवर वाईट नजर होती. त्यातूनच त्याने एके दिवशी महिला पार्लरमध्ये असताना तिचा मोबाइल घेऊन नंबर मिळवला. 


अश्लील कृत्य

१६ डिसेंबर २०१९ रोजीच्या रात्री १.३० वा. अबसरने तिला व्हिडिओ काॅल केला. महिलेच्या मोबाइलमध्ये अबसरचा मोबाइल नंबर सेव नव्हता. तरीही झोपेत महिलेने तो काॅल उचलला. त्यावेळी समोरील व्यक्ती त्याचा चेहरा लपवून हस्तमैथुन करत होता. हे पाहून महिलेने फोन कट करत त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, ४ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान वारंवार फोन करून हा महिलेला त्रास देत,  अश्लील कृत्य करत होता. 


मोबाइल नंबरवरून माग

रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने वरळी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी संबंधीत नंबरच्या मदतीने आरोपीचा माग काढला असता तो नंबर अबसरच्या सासऱ्यांचा असल्यांचं उघडकीस झालं. तो नंबर सासऱ्यांनी अबसरला एका वर्षापूर्वी दिला होता. सध्या अबसर उत्तरप्रदेशच्या बीजनोर येथील मूळ गावी गेला असल्याचे त्याच्या सासऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. बुधवारी अबसर हा मुंबईत आला असल्याचे कळाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबूली दिली. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ३५४(ड), ५०९,६७,६७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवत अटक केली.  



हेही वाचा -

हसीना पारकरच्या घराचा होणार लिलाव

नशेत झालेल्या वादातून मित्राची हत्या




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा