नशेत झालेल्या वादातून मित्राची हत्या

नशेत दोघांमध्ये कोणाशी मैत्री करावी, कोणाशी करू नये यावरून वाद झाला. शाब्दीक वादाचं रुपांतर काही वेळेने हाणामारीत झालं. त्यावेळी कपिल रुपवतेने नशेत संदीप पाळके याच्या अंगावर बसून त्याच्या छातीत बुक्क्याने बेदम मारहाण केली.

नशेत झालेल्या वादातून मित्राची हत्या
SHARES

चुन्नाभट्टी परिसरात मद्यपान करण्यासाठी बसलेल्या दोन मित्रांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. या मारहाणीत संदीप पाळके या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. 

 

छातीत बुक्क्याने मारहाण

चुनाभट्टी येथील लाल डोंगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास संदीप आणि कपिल रुपवते हे दोन मित्र मद्यपान करत बसले होते. त्यावेळी नशेत दोघांमध्ये कोणाशी मैत्री करावी, कोणाशी करू नये यावरून वाद झाला. शाब्दीक वादाचं रुपांतर काही वेळेने हाणामारीत झालं. त्यावेळी कपिल रुपवतेने नशेत संदीप पाळके याच्या अंगावर बसून त्याच्या छातीत बुक्क्याने बेदम मारहाण केली. त्यावेळी स्थानिकांनी त्या दोघांची भांडणे सोडवली. 


उपचारादरम्यान मृत्यू 

संदीप घरी आल्यानंतर अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्यावेळी कपिलने मारहाण केल्यानंतर छातीत दुखू लागल्याचे संदीपने त्याच्या आईला सांगितले. कुटुंबियांनी त्याला चेंबूरच्या सुश्रृषा रुग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यान संदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणी संदीपच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी मृतदेह सायन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवत, चुनाभट्टी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून कपिलला अटक केली. हेही वाचा - 

ये दिवार टुटेगी कैसे? डायनामाईटच्या स्फोटानंतरही नीरव मोदीचा बंगला उभाच!
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा