Coronavirus cases in Maharashtra: 943Mumbai: 536Pune: 105Pimpri Chinchwad: 39Islampur Sangli: 26Ahmednagar: 26Kalyan-Dombivali: 23Navi Mumbai: 22Thane: 20Nagpur: 19Panvel: 11Aurangabad: 10Vasai-Virar: 8Latur: 8Buldhana: 7Satara: 5Yavatmal: 4Usmanabad: 3Ratnagiri: 2Kolhapur: 2Jalgoan: 2Nashik: 2Other State Resident in Maharashtra: 2Ulhasnagar: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Gondia: 1Palghar: 1Washim: 1Amaravati: 1Hingoli: 1Jalna: 1Total Deaths: 52Total Discharged: 66BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

हसीना पारकरच्या घराचा होणार लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या घरावर केंद्रीय यंत्रणा सफेमा अंतर्गत कारवाई करणार आहे. तिचं घर ताब्यात घेऊन लिलाव करण्यात येणार आहे.

हसीना पारकरच्या घराचा होणार लिलाव
SHARE

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या घरावर केंद्रीय यंत्रणा सफेमा अंतर्गत कारवाई करणार आहे. तिचं घर ताब्यात घेऊन लिलाव करण्यात येणार आहे. नागपाड्यातील गॉर्डन हॉल येथील तिच्या घरावर ही कारवाई केली जाणार आहे. तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) अंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे.


मालमत्ता जप्तीचे आदेश

२०१४ मध्ये हसीना पारकरचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा धाकटा भाऊ इक्‍बाल कासकर तेथे राहायचा. २०१७ मध्ये खंडणीप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने इक्‍बालला तेथूनच अटक केली होती. सफेमा कायद्यांतर्गत तस्करी व गैरकृत्यातून जमा केलेल्या मालमत्तांचा लिलाव करता येतो. या कायद्याच्या कलम ६८ फ अंतर्गत तस्कर आरोपीच्या नातेवाईकांच्या मालमत्ताही जप्त करण्याची तरतुद आहे. ही यंत्रणा थेट केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. त्यांना १९९८ मध्ये या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात आले होते. पारकरच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. एप्रिल २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाऊदच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. 


याआधीही लिलाव

दाऊदच्या कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका यावेळी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानुसार या घरावर टाच आणली असून पुढच्या कारवाईअंतर्गत या मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. त्याआधी रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा लिलाव झाला होता. सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने ११.५८कोटी रुपयांमध्ये या मालमत्तांचा ताबा मिळवला होता. हेही वाचा - 

नशेत झालेल्या वादातून मित्राची हत्या

पालघरमध्ये २ टेम्पो जिलेटिन, डिटोनेटर जप्त
संबंधित विषय
संबंधित बातम्या