पालघरमध्ये २ टेम्पो जिलेटिन, डिटोनेटर जप्त

पुलवामा हल्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणांना खबरदारीचा इशार देण्यात आला आहे. पालघर पोलिसांना खबऱ्यांमार्फत चिल्हार परिसरात अज्ञात व्यक्तींनी डिटोनेटर आणि जिलेटिनच्या काड्या निर्जनस्थळी लपवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली.

पालघरमध्ये २ टेम्पो जिलेटिन, डिटोनेटर जप्त
SHARES

पालघरच्या बोईसर येथील चिल्हार परिसरात २ टेम्पो भरून जिलेटिन आणि डिटोनेटर अशी स्फोटकं पकडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या स्फोटकांची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. आॅक्टोबर महिन्यात देखील या भागातून पोलिसांनी ३५० जिलेटिनच्या कांड्या हस्तगत केल्या होत्या.

खबरदारीचा इशारा

पुलवामा हल्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणांना खबरदारीचा इशार देण्यात आला आहे. पालघर पोलिसांना खबऱ्यांमार्फत चिल्हार परिसरात अज्ञात व्यक्तींनी डिटोनेटर आणि जिलेटिनच्या काड्या निर्जनस्थळी लपवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली.

घातपाताचा प्रयत्न

मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या या स्फोटकांचा माग पोलिस काढत आहेत. काही महिन्यांपूर्वीच पालघरच्या नागझरी येथील घरात बेकायदेशीरपणे जिलेटीनचा साठा पोलिसांना सापडला होता. त्यात २ बॉक्समध्ये सुमारे ३५० जिलेटीन कांड्या सापडल्या होत्या. तसंच पालघरच्या सातवली गावात २०१६ मध्ये एका खिंडारात देखील आरडीएक्सचा साठा आढळून आला होता.

दिवाळीत या स्फोटकांच्या साहाय्याने शहरात घातपात करण्याचा प्रयत्न एटीएसने हाणून पाडला होता. एका मागोमाग एक मिळणाऱ्या स्फोटकामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

हेही वाचा-

ये दिवार टुटेगी कैसे? डायनामाईटच्या स्फोटानंतरही नीरव मोदीचा बंगला उभाच!

चक्रे फिरली, पोलिसांची ८ तासांची ड्युटी पुन्हा १२ तासांवर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा