पबमध्ये विवाहितेशी गैरकृत्य, गुजरातमधील ४ व्यावसायिकांना अटक

नशेच्या धुंदीत पबसारख्या ठिकाणी महिलांसोबत विनयभंगचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. सांताक्रुझच्या एका पबमध्ये एका २६ वर्षीय विवाहित महिलेशी छेडछाड केल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

पबमध्ये विवाहितेशी गैरकृत्य, गुजरातमधील ४ व्यावसायिकांना अटक
SHARES

नशेच्या धुंदीत पबसारख्या ठिकाणी महिलांसोबत विनयभंगचे प्रकार अद्यापही सुरूच आहेत. सांताक्रूझच्या एका पबमध्ये एका २६ वर्षीय विवाहित महिलेशी छेडछाड केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी गुजरातमधील चौघांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


अटक केलेले व्यावसायिक

अटक करण्यात आलेले अक्षय राज, राहुल सिन्हा, अरुणसिंह गोहील आणि विराज सिंह हे चारही जण गुजरातमधील मोठे व्यावसायिक आहेत. मुंबईत एका बिझनेस ट्रीपसाठी ते आले होते. काम संपवून हे चौघे शनिवारी जुहू तारा रोडावरील बोरा बोरा पबमध्ये गेले होते. नशेत असलेल्या चौघांनी तेथे विवाहितेकडे पाहून अश्लील हावभाव करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला विवाहितेने त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र त्यानंतर त्यांचं कृत्य त्या महिलेने आपल्या पतीला सांगितलं.

सदर महिलेचा पती जाब विचारण्यासाठी गेला असता या चौघांनी त्याला मारहाण करत शिविगाळ केली. वेळीच पबमधील मॅनेजरने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केल्याने सांताक्रूझ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अक्षय राज, राहुल सिन्हा, अरुणसिंह गोहील आणि विराज सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली या प्रकरणी आता पोलिस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा - 

विवाहितेचा पाठलाग करून त्रास देणाऱ्यास अटक

खात्री न करता मोबाइल विकणं पडलं महागात
Read this story in हिंदी
संबंधित विषय