Advertisement

विधानसभा निवडणुकीमुळं दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी


विधानसभा निवडणुकीमुळं दिवाळीच्या सुट्टीत बदल करण्याची शिक्षकांची मागणी
SHARES

यंदा विधानसभा निवडणूक ऐन दिवाळी सुट्टीच्या काळात घेतली जाणार आहे. या निवडणुकीचा परिणाम शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षांवर होणार असून, शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्टीचा प्रश्न उपस्थित होत आहेविधानसभा निवडणूक मतदानाची तारीख २१ आॅक्टोबर असल्यानं शिक्षक २२ आॅक्टोबरपर्यंत निवडणूक कामात व्यस्त असणार आहेत. त्यामुळं यंदा दिवाळीची सुट्टी २३ किंवा २४ आॅक्टोबरनंतर लागू करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांकडून शिक्षण उपसंचालकांकडं करण्यात आली आहे.

शाळांना सुट्टी

विधानसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यानं शिक्षकांना दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग नसल्यानं या सुट्टीत बदल करण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. १२ एप्रिलच्या शिक्षण संचालनालयाच्या पत्राद्वारे २१ आॅक्टोबरपासून शाळांना सुट्टी देण्यात यावी, अशी अधिसूचना करण्यात आली आहे.

दिवाळीची सुट्टी 

परंतु, २१ आॅक्टोबर रोजी शिक्षण विभागानं या दिवशी सुट्टी देणं सयुक्तिक ठरणार नाही. २१ व २२ आॅक्टोबर रोजी सुट्टी दिल्यास शिक्षकांना त्यांची दिवाळीची सुट्टी उपभोगताच येणार नाही. तसंच, मग अशा सुट्टीचा उपयोग काय, असा सवाल शिक्षक करीत आहेत. त्यामुळं दिवाळीची सुट्टी २३ व २४ आॅक्टोबरनंतर देण्याची शिक्षकांची मागणी आहे. काही शाळांनी वेगवेगळ्या कारणांनी ७६ सुट्ट्यांमधील काही सुट्ट्या कापून घेणं, राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या नाकारणं, साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी बोलावणं असं प्रकार सुरू केलं असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

बेस्ट वसाहतींच्या दुरूस्तीसाठी महापालिका देणार १० कोटी

घरासाठी महापालिका मुख्यालयावर माहुलवासीयांची धडक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा