Advertisement

बेस्ट वसाहतींच्या दुरूस्तीसाठी महापालिका देणार १० कोटी


बेस्ट वसाहतींच्या दुरूस्तीसाठी महापालिका देणार १० कोटी
SHARES

बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिका आर्थिक मदत करत आहे. याआधी महापालिकेनं बेस्टला कर्जाची रक्कम भरण्यासाठी आर्थिक मदत केली होती. अशतच आता महापालिकेनं बेस्टला आणखी १० कोटींचं अनुदान देण्याची तयारी दाखविली आहे. या रकमेचा वापर बेस्ट कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी  करण्यात येणार आहे. त्याशिवाय, बेस्ट उपक्रमानं वसाहतींच्या दुरुस्तीवर केलेल्या खर्चाची देयकं सादर केल्यास टप्प्याटप्प्यानं महापालिका ही रक्कम अदा करणार आहे.

बिनव्याजी कर्ज

बेस्ट उपक्रमाला सुमारे १२०० कोटींचं बिनव्याजी कर्ज, ६०० कोटींचं अनुदान महापालिकेनं गेल्या वर्षभरात दिले आहे. त्याचसोबत बेस्ट कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वसाहतींच्या दुरुस्तीसाठी देखील आता आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

१० कोटींची तरतूद

सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात १० कोटींची तरतूद कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी केलेली आहे. याआधी महापालिकेनं सन २०१८-१९ मध्ये मोडकळीस आलेल्या वसाहतींच्या दुरुस्तीवर १ कोटी ९ लाख १ हजार ९४८ रुपये खर्च केले होते.ही रक्कम खर्च केल्याचे सर्व कागदपत्रं, देयकं दिल्यानंतर महापालिकेनं त्याचं अधिदान केलं होतं. तसंट, एप्रिल २०१९ पर्यंत १ कोटी ८६ हजार रुपयांचं अधिदान केलं आहे.हेही वाचा -

घरासाठी महापालिका मुख्यालयावर माहुलवासीयांची धडक

मुंबईत एकाच रात्री ३ ठिकाणी आग

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय