मुंबईत एकाच रात्री ३ ठिकाणी आग


SHARE

मुंबईत एका रात्रीत ३ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये ६ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

गोदामाला भिषण आग

सांताक्रुझ येथील मिलन सब-वे परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीत ३ गोदामं जळून खाक झाली आहेत. तसंच, आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या १० गाड्यांच्या सहाय्यानं ही आग नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर,वडाळ्यातही गणेशनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आग्रीपाडा येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं म्हटलं जात आहे. अग्निशमन दलाच्या १० गाड्यांच्या सहाय्यानं ही आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र, गणेशनगर येथील झोपडपट्टीला आणि गोदामाला आग लागल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

 


हेही वाचा -

अभिनेता सलमान खानच्या घरातून सराईत आरोपीला अटक

फुकट काॅलचा खेळ खल्लास! जिओही आकारणार आता शुल्कसंबंधित विषय
ताज्या बातम्या