एअर इंडिया कर्मचाऱ्यांना पाठवणार ५ वर्ष बिनपगारी सक्तिच्या रजेवर

एअर इंडियानं एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. एअर इंडियानं आपल्या कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांपासून ६० महिने म्हणजेच ५ वर्षांपर्यंत बिनापगारी सुट्टीवर पाठवण्याची तयारी केली आहे. यासाठी एअर इंडिया बोर्डाची परवानगी मिळाली आहे.

चांगली कामगिरी नसणाऱ्या म्हणजेच ज्यांचं काम चांगलं नसेल अशा (non-perfomance) कर्मचाऱ्यांना ही बिनपगारी सुट्टी दिली जाऊ शकते. यासंदर्भात व्यवस्थापन तीन स्तरावर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन करणार आहे. त्यानंतर कोणत्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी सक्तीची रजा द्यायची हे ठरवण्यात येईल.

बोर्डाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांनी एअर इंडियाच्या काही कर्मचाऱ्यांना बिनापगारी पाच वर्षांपर्यंत सुट्टीवर पाठवण्याची परवानगी दिली आहे. या योजनेअंतर्गत एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांपासून ते ६० महिन्यांपर्यंतची विनपगारी सुट्टी वाढवता येऊ शकते.


हेही वाचा : Vande Bharat Mission: ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २८ हजार ४३५ प्रवासी मुंबईत दाखल


अधिकृत आदेशानुसार एअर इंडियाच्या सीएमडी राजीव बंसल आता कर्मचाऱ्यांना ६ ते २ वर्षांसाठी सुट्टीवर पाठवू शकतात. हा अवधी ५ वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. एअरलाइनवर आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. केंद्र सरकार एअरलाइनला विकण्याच्या प्रयत्न करीत असताना एअर इंडियानं हा निर्णय घेतला आहे. सध्या एअरलाइनची विक्रीची प्रक्रिया कोरोनाच्या महासाथीमुळे अडकली आहे.

एअर इंडिया सुमारे १३ हजार स्थायी कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनासाठी सुमारे २३० कोटी रुपये खर्च करते. सरकारच्या मालकीच्या एअरलाइन्सनं यापूर्वी कोरोना आजारामध्ये आपल्या कर्मचार्‍यांना पगार देण्यास उशीर केला आहे. कोरोनव्हायरसच्या उद्रेकामुळे सर्व वाटाघाटी अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत. केंद्र सरकार विमान वाचवण्यासाठी खासगी गुंतवणुकदारांचा शोध घेत आहे.

देशांतर्गत विमान कंपनी गो एअरनं देखील एप्रिलपासून सक्तीच्या रजेवर (LWP) बहुतेक कर्मचार्‍यांना पाठवलं आहे. तथापी, बहुतेक देशांतर्गत कामकाज मार्चच्या उत्तरार्धापासून सुरू झालं आहे.


हेही वाचा

मुंबईतील रेल्वेची 'अशी' होत आहे नियमित सफाई

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबल डेकर बस

पुढील बातमी
इतर बातम्या