Advertisement

vande bharat mission: ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २८ हजार ४३५ प्रवासी मुंबईत दाखल

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत १८२ विमानांनी २८ हजार ४३५ नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत.

vande bharat mission: ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २८ हजार ४३५ प्रवासी मुंबईत दाखल
SHARES

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत आतापर्यंत १८२ विमानांनी २८ हजार ४३५ नागरिक मुंबईत (28 thousand 435 passengers arrived in mumbai under vande bharat mission) दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या १० हजार ३४७ आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या ९ हजार ७५२ आहे. तर इतर राज्यातील ८ हजार ३३६ प्रवासीही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत. १५ जुलै २०२० पर्यंत राज्यात आणखी ४० विमानांनी प्रवासी मुंबईत येणं अपेक्षित आहे.

परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरून घेऊन त्यांना क्वारंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत केली जात आहे.

‘या’ देशातून आले प्रवासी…

ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका,  इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आयर्लंड, कतार, हाँगकाँग,  कझाकिस्तान, मॉरिशिअस, ब्राझील, थायलंड,  केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन,  इथिओपिया,रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्ट इंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर,  नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व आफ्रिका,  फ्रान्स, नैरोबी,न्यूयार्क, जॉर्जिया, कामेरुन, या देशांतून प्रवासी आले आहेत.

हेही वाचा - 'बेस्ट'ला दररोज ८० लाखाहून अधिक उत्पन्न

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचं काम  जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचं काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या २४ मे २०२० च्या मार्गदर्शक सुचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचं काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवलं जात आहे तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे. ‘वंदेभारत’ अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर,बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लि. यांच्या समन्वयाने केलं जात आहे.

वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा