Advertisement

लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

वैयक्तिक वाहनावरील पेट्रोल-डिझेलसाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे, तर खासगी वाहने अवाच्या सव्वा भाडे आकारत आहेत.

लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी
SHARES

मुंबईत दररोज पुणे, नाशिक येथून अनेक कर्मचारी कामासाठी येत असतात. दररोज ट्रेनचा प्रवास करत आपलं कार्यालय हे कर्मचारी गाठतात. परंतु, सध्या राज्यात लॉकडाऊन असल्यानं रेल्वेची वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळं नोकरदार वर्गाला याचा फटका सहन करावा लागत आहे. सार्वजनिक वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने त्यांना खासगी गाड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. वैयक्तिक वाहनावरील पेट्रोल-डिझेलसाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे, तर खासगी वाहने अवाच्या सव्वा भाडे आकारत आहेत.

पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या शेकडो नोकरदार वर्गाला बसत आहे. यातील बहुतांश चाकरमानी मंत्रालय, पालिकेच्या सेवेतील कर्मचारी आहेत. तर काही जण खासगी आस्थापनांतील आहेत. सद्य:स्थितीत एसटी आणि रेल्वे सेवा बंद आहे, त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. काही जण पावसाळी वातावरण असताना धोका पत्करून दुचाकी वाहनावरून पुणे ते मुंबई असा प्रवास करून कामावर येत आहेत.

दरम्यान, लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या बंद आहेत. परिणामी अनेक प्रवाशांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळं खिशाला कात्री लागत असून आर्थिक स्थिती आणखी बिकट होत चालली आहे. त्यामुळं या गाड्या सुरू करून त्यातून प्रवासाची परवानगी द्यावी अशी मागणी अनेक कर्मचारी करत आहेत.हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पारसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा