Advertisement

'बेस्ट'ला दररोज ८० लाखाहून अधिक उत्पन्न


'बेस्ट'ला दररोज ८० लाखाहून अधिक उत्पन्न
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. परंतु, अनसॉक 1.0 च्या अंतर्गत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बेस्ट उपक्रमानं आपल्या बसच्या संख्येत वाढ केली आहे. बसच्या संखअयेत वाढ झाल्यानं आपोआपच प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी प्रवाशी वाढल्यानं उत्पन्नातही वाढत आहे. बेस्टला दररोज ८० लाखाहून अधिक उत्पन्न मिळत असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्यस्थितीत बेस्टच्या ताफ्यातील २९२६ बस रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मागील आठवड्यात ७ लाख असलेली प्रवाशी संख्या बुधवारी ८ लाख ५८ हजार ८८८ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळं सुमारे ८४ लाख रुपये इतकं उत्पन्न मिळाले. रेल्वे फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. मात्र, बेस्ट सर्वांसाठी सुरू असल्यानं रेल्वेचे प्रवाशी बेस्टनं प्रवास करीत आहेत.

कोरोनाचा अजूनही नियंत्रणात नाही. बसमधून चढण्या उतरण्याची प्रवाशाना शिस्त नाही. कोरोनाचा धोका समोर दिसत असूनही नागरिक बससाठी तुडुंब गर्दी करीत आहेत. सोशल डिस्टनसिंग पाळले नाही तर बेस्टची लाल परी धोक्याची ठरू शकते.हेही वाचा -

समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

Covid-19 Test: महाराष्ट्रात १० लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पारसंबंधित विषय
POLL

कोलकाता विरुद्धचा सामना जिंकून मुंबई इंडियन्स मिळवेल का पहिला विजय ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा