सोन्याच्या दरानं गाठला उच्चांक, मुंबईत सोनं ५४ हजारांच्या पार

सोन्याचे दर दिवसेंदिवस रोज नवा रेकॉर्ड (Gold Price Record High) रचत आहेत. देशभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकर्मनामुळे सर्वच आर्थिक व्यवहारांवर त्याचा परिणाम होत आहे. सोन्याच्या किमती वाढण्याचं महत्त्वाचं कारण देखील हेच आहे.

मुंबईमध्ये देखील सोन्याच्या किंमतीमध्ये खूप जास्त वाढ होत आहे. सोन्याचे दर आज विक्रमी स्तरावर (Gold Rates Today) पोहोचले आहेत. मुंबईमध्ये सोन्याचे भाव प्रति तोळा ५४ हजार ८२८ रुपये झाले आहेत. हे दर जीएसटीसह आहेत.

हेही वाचा : बिग बास्केट, ग्रॉफर्स, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनला जिओ मार्टची टक्कर

नवी दिल्लीतील सराफा बाजारात देखील सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा ९०५ रुपयांनी वाढले होते. यानंतर सोन्याचे भाव ५२ हजार ९६० रुपये प्रति तोळा या रेकॉर्ड स्तरावर पोहोचले होते. तर चांदीचे भाव मात्र सोमवारी उतरले होते. चांदीमध्ये मोठी घसरण सोमवारी पाहायला मिळाली. सोमवारी चांदी प्रति किलो ३ हजार ३४७ रुपयांनी कमी झाल्यामुळे काल चांदीचे भाव ६५ हजार ६७० रुपये प्रति किलो होते.

२४ तासात सोन्याचे दर तब्बल ३ हजारानं वाढले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर आजपर्यंतच्या विक्रमी स्तरावर पोहोचले आहेत. सोन्याचे भाव याच पटीनं वाढत राहिले तर दिवाळीपर्यंत सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


हेही वाचा 

ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका बंद

JioMart App लाँच, १० लाख युजर्सचा टप्पा पार

पुढील बातमी
इतर बातम्या