Advertisement

JioMart App लाँच, १० लाख युजर्सचा टप्पा पार

जिओमार्टचं App देखील ग्राहकांसाठी उपलब्ध झालं आणि काही दिवसांतच १० लाख युजर्सचा टप्पा देखील या Appनं पार केला.

JioMart App लाँच, १० लाख युजर्सचा टप्पा पार
SHARES

लॉकडाऊनमध्ये अधिक सोईसकर म्हणून रिलायन्सनं काही दिवसांपूर्वी ग्राहकांसाठी ऑनलाइन किराणा प्लॅटफॉर्म 'जिओ मार्ट' (JioMart) उपलब्ध करून दिला. जिओमार्टचं App देखील ग्राहकांसाठी उपलब्ध झालं आणि काही दिवसांतच १० लाख युजर्सचा टप्पा देखील या Appनं पार केला. 

लाँचच्या काही दिवसातच हे अ‍ॅप आतापर्यंत १० लाख युजर्सनी डाऊनलोड केलं आहे. गुगल प्ले स्टोअरवरील शॉपिंग कॅटेगरीतील टॉप ३ पैकी 'जिओमार्ट' एक App बनलं आहे.

अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइस वापरणाऱ्या मोबाइल जनरेशनसाठी हे अ‍ॅप डिझाइन करण्यात आले आहे. याद्वारे ऑर्डर प्लेस करण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. याआधी जिओमार्टची वेबसाइट लाँच करण्यात आली होती, दरम्यान ग्राहकांच्या सोयीसाठी आता App देखील लाँच करण्यात आले आहे. आता ग्राहकांना त्यांच्या मोबाइलवर एका क्लिकवरून किराणा आणि इतर काही महत्त्वाते प्रोडक्ट्स ऑर्डर करता येतील. देशभरातील 200 ठिकाणी जिओमार्टची डिलिव्हरी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मार्केटमध्ये सध्या जिओमार्टची स्पर्धा Amazon आणि Flipkart शी आहे. रिलायन्सच्या व्हर्च्यूअल एजीएमनंतर आठवडाभरातच जिओमार्टचे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे.

दरम्यान मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, ग्राहकांच्या सोयीसाठी जिओमार्ट WhatApp बरोबर काम करेल. जेणेकरून लोकांना सोप्या पद्धतीनं विविधं उत्पादनं खरेदी करता येतील.

स्थानिक किराणा दुकाने आणि ग्राहकांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही प्लॅटफॉर्म काम करतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली होती.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा