Advertisement

बिग बास्केट, ग्रॉफर्स, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनला जिओ मार्टची टक्कर

जिओ मार्टने प्रतिस्पर्धी ग्रॉफर्स, बिग बॉस्कोट आणि अॅमेझॉनशी स्पर्धा करण्यास सुरवात केली आहे. जिओ मार्टने किराणा मालावर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे.

बिग बास्केट, ग्रॉफर्स, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉनला जिओ मार्टची टक्कर
SHARES

फेसबुकचे व्हॉट्सअप आणि रिलायन्स जिओच्या मदतीने जिओ मार्टची सेवा सुरू करण्यात आली आहे. जिओमार्ट हा एक इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. यामार्फत तुम्हाला किराणा घरबसल्या आॅर्डर करता येणार आहे.

आतापर्यंत जिओ मार्टच्या वेबसाइटद्वारे आॅर्डर देता येत होती. आता रिलायन्सने जिओ मार्ट अॅप लाँच केलं आहे. या अॅपच्या मार्फत किराना सामानाची आॅर्डर देता येणार आहे. अ‍ॅपद्वारे आता ऑर्डर करणे सोपे होणार आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्टशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्सने जिओ मार्ट अॅप लाँच केलं आहे. जिओमार्टमध्ये आता फक्त किराणा सामान आणि खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत. पण आगामी काळात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूॆपासून फॅशन आणि फार्मा वस्तू मिळतील. रिलायन्सने अँड्रॉइड आणि आयफोन या दोहोंसाठी अ‍ॅप्स लाँच केले आहेत. हे Google Play Store आणि अॅपल अ‍ॅप स्टोअर वरून डाउनलोड केले जाऊ शकते. देशातील २०० शहरांमध्ये जिओमार्टची सेवा सुरू आहे.

जिओ मार्टने प्रतिस्पर्धी ग्रॉफर्स, बिग बॉस्कोट आणि अॅमेझॉनशी स्पर्धा करण्यास सुरवात केली आहे. जिओ मार्टने किराणा मालावर मोठ्या प्रमाणात सूट दिली आहे. ही सूट इतर कंपन्यांसाठी समस्या निर्माण करू शकते. जीवनावश्यक वस्तूंसाठी भारताच्या वाढत्या ऑनलाइन बाजारामध्ये जिओला मोठी संधी दिसत आहे.

कंपनीने नुकतीच मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात पायलट प्रकल्प म्हणून त्याची सुरुवात केली आहे. जिओ मार्टने कमी किंमतीत तांदूळ, तेल, मैदा, साखर आणि इतर अशा अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू केला आहे. महाराष्ट्रानंतर रिलायन्स जिओ मार्ट त्याचा विस्तार देशभर करेल. त्याअंतर्गत २०० शहरांमध्ये जिओ मार्टची सेवा असेल.

जिओ मार्टने जास्तीत जास्त किरकोळ किंमतीवर (एमआरपी) किमान ५ टक्के सूट दिली आहे. काही वस्तूंवर १५ टक्क्यांहून अधिक सूट देत आहे. अॅमेझॉन आणि बिग बास्केट ९ टक्के सूट देत आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्विगी झोमॅटो किंवा या क्षेत्रातील अन्य कोणत्याही कंपनीपेक्षा कमी दरात जिओ मार्टवरुन सामान खरेदी करता येईल असा कंपनीचा दावा आहे. तसंच, किमान रक्कमेच्या खरेदीची कोणतीही अट न ठेवता कंपनीकडून सामानाची फ्री डिलिव्हरी दिली जाईल.

लाँच झाल्यानंतर काही दिवसातच जिओ मार्ट अ‍ॅप १० लाख युजर्सनी डाऊनलोड केलं आहे. गुगल प्ले स्टोअरवरील शॉपिंग कॅटेगरीतील टॉप ३ पैकी जिओ मार्ट एक अ‍ॅप बनलं आहे. जिओ मार्टचा वापर अ‍ॅपऐवजी जर वेबसाइटवर करायचा असेल सर्वात प्रथम जिओ मार्टच्या
https://www.jiomart.com/ या संकेतस्थळावर जावं लागेल. वेबसाइटवर गेल्यानंतर समोरच एक बॉक्स येईल. त्यामध्ये एरियाचा पिन कोड टाकावा लागेल. क्षेत्र ग्रीन झोनमध्ये असेल तर तुम्हाला जिओ मार्टची डिलिव्हरी घरपोच मिळेल.

जिओ मार्ट अॅपवर दररोज अडीच लाख ऑर्डर बुक होत आहेत. ऑनलाइन किराणा व्यवसाय प्रकारात ऑर्डरची संख्या ही सर्वाधिक आहे. ऑर्डरची संख्या वाढतच आहे. जिओ मार्ट अॅपच्या आधी कंपनी आपल्या वेबसाइटवर ऑर्डर बुक करायची. अ‍ॅप आल्यानंतरही ग्राहकांची जुनी खाती तशीच राहणार आहेत. कंपनीने अशी व्यवस्था केली आहे की ज्यामध्ये ग्राहक वेबसाइट, अँड्रॉइड आणि अॅपल आयओएस सारख्या जवळजवळ सर्व प्लॅटफॉर्मवर त्यांचे लॉगिन खाते वापरून लॉग इन करू शकतील. म्हणजेच, वेबसाइटवर ऑर्डर केलेली समान ऑर्डर ग्राहकांच्या अँड्रॉईड मोबाईल फोनवर उपलब्ध असेल आणि मोबाइल फोनवरून तयार केलेली ऑर्डर वेबसाइटवर उपलब्ध असेल.

 

देशात बिग बास्केट, ग्रॉफर्स, फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आणि इतर अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. लॉकडाऊनमुळे किराणा सामान किंवा दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या मागणीत वाढ झाल्यानं झोमाटो, स्विगी, उबर यासारख्या अनेक कंपन्यांनी दरवाजावर किराणा सामान वितरीत करण्यास सुरवात केली आहे. मात्र, या सर्वांना जिओची टक्कर असेल.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा