'द व्हायरल फीव्हर' (TVF) चा सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार याने अखेर राजीनामा दिला आहे. 'राजीनामा जरी दिला असला, तरी मेंटर म्हणून मी उपलब्ध असेन' असे अरुणाभ कुमारने सांगितले आहे. अरुणाभ कुमार याच्याविरोधात टीव्हीएफमध्येच काम करणाऱ्या एका कर्मचारी महिलेना लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. सदर महिलेने केलेल्या तक्रारीनंतर एमआयडीसी पोलिस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता.
2016 साली पीडित तरुणी मुलाखतीसाठी गेली असता अरुणाभ कुमारने तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप या महिलेने केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. अरुणाभ कुमारविरोधात लैंगिक छळाचा आरोप होण्याची ही दुसरी वेळ होती. याआधी टीव्हीएफची माजी कर्मचारी असलेल्या महिलेने ब्लॉगच्या माध्यमातून अरुणाभ कुमारने लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. 2014 ते 2016 दरम्यान टीव्हीएफमध्ये काम करत असताना आपला लैंगिक छळ करण्यात आल्याचे तिने पोस्टमध्ये लिहिले होते. ही पोस्ट सोशल मीडियावर देखील व्हायरल झाली होती.
अरुणाभला आता तरी अटक होणार का?
टिव्हीएफचा संस्थापक अरुणभ कुमारची कुठलीही चौकशी नाही
टीव्हीएफने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच खोटे आरोप करणाऱ्या आणि चुकीची माहिती देणाऱ्यांना सोडणार नाही, असे म्हटले होते. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत अरुणाभ यांनी त्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, तसेच या प्रकरणी निष्पक्ष न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती.