अरुणाभला आता तरी अटक होणार का?


अरुणाभला आता तरी अटक होणार का?
SHARES

वर्सोवा - टीव्हीएफचा संस्थापक अरुणाभ कुमार विरोधात आता पोलिसांनी फास आवळण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अरुणाभ विरोधात गुन्हा दाखल होऊन २४ तास होतात न होतात, तोच आता वर्सोवा पोलीस ठाण्यात देखील अरुणाभविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ३५४ (अ) कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बुधवारी अरुणाभसोबत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने अरुणाभ विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. पीडित महिला टीव्हीएफमध्ये काम करत असताना गतवर्षी २०१६च्या मे महिन्यात अरुणाभने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावले. तिथे काही व्हिडिओ दाखवण्याच्या नावावर त्याने या महिलेवर अश्लील शेरेबाजी केली. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर महिलेला त्याने आपत्तीजनक स्पर्श केल्याचं या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आजवर भीतीपोटी ही महिला कधी समोर आली नव्हती.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर देखील आम्ही आरोपांची तसेच पुराव्यांची शहानिशा करू आणि त्यानंतरच कारवाई करणार असल्याचा पोलिसांचा सूर होता. पण आता अरुणाभ विरोधात दुसरा गुन्हा दाखल झाल्यावर तरी पोलीस अरुणाभला अटक करणार की नाही हा खरा प्रश्न आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा