अखेर अरुणाभ विरोधात गुन्हा दाखल

  Andheri
  अखेर अरुणाभ विरोधात गुन्हा दाखल
  मुंबई  -  

  मुंबई - महिलांच्या लैंगिक छळाचा आरोप असलेल्या टीव्हीएफचा संस्थापक अरुणाभ कुमार विरुद्ध अखेर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि महिलांना अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी टीव्हीएफचा संस्थापक अरुणाभ कुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती डीसीपी अश्विनी सानप यांनी दिली आहे. टीव्हीएफमध्ये काम करणाऱ्या एका महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  काही दिवसांपूर्वी टीव्हीएफच्या एका माजी कर्मचारी महिलेने अरुणाभवर विनायभंगाचा आरोप केला होता. या महिलेचा हा ब्लॉग व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ माजला होता. एवढंच नाही तर यानंतर इतर महिलांनी देखील सोशल मीडियावर अरुणाभकडून त्यांना करण्यात आलेल्या छळाची आपबीती सांगिताली होती.

  या प्रकरणी अरुणाभविरोधात आता गुन्हा दखल झाला असून मुंबई पोलीस अरुणाभला कधी अटक करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.