टिव्हीएफचा संस्थापक अरुणभ कुमारची कुठलीही चौकशी नाही

Andheri
टिव्हीएफचा संस्थापक अरुणभ कुमारची कुठलीही चौकशी नाही
टिव्हीएफचा संस्थापक अरुणभ कुमारची कुठलीही चौकशी नाही
See all
मुंबई  -  

अंधेरी - महिलांचा कथित लैंगिक छळाचा आरोप असलेल्या टिव्हीएफचा संस्थापक अरुणभ कुमार याला अद्याप मुंबई पोलिसांनी कुठल्याही चौकशीला बोलावले नाही. मुंबईच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अरुणभ विरोधात तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्यानंतर अरुणभला मुंबई पोलिसांनी चौकशीला बोलावल्याच्या अफवांना उधाण आलं होतं. चौकशी सुरू असली तरी चौकशीला बोलावल्याच्या बातमीचं मात्र मुंबई पोलिसांनी खंडन केलं आहे.

काही दिवसांपूर्वी टिव्हीएफच्या माजी कर्मचारी महिलेने अरुणभवर विनयभंगाचा आरोप लावला होता. या महिलेचा ब्लॉग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता. एवढंच नाही तर यानंतर इतर महिलांनीही देखील सोशल मिडियावर अरुणभकडून झालेल्या छळाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली. या सर्व प्रकारानंतर रिझवान सिद्दीकी नावाच्या वकिलाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात अरुणभ विरोधात तक्रार केली होती.

दरम्यान,  अरुणभने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत. तो म्हणतोय की ज्या महिलांनी हे आरोप माझ्यावर लावलेत त्या महिलांनी कधीच टिव्हीएफसोबत काम केलेलं नाही. त्याचसोबत या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीत टीव्हीएफ आणि काही इतर सदस्य आहेत. टीव्हीएफ एक व्हायरल फिव्हर ऑनलाईन एंटरटेनमेंट चॅनल आहे आणि अरुणभ कुमार या चॅनलचा संस्थापक आहे. 2011 मध्ये या चॅनची स्थापना करण्यात आली होती.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.