धक्कादायक! मुंबई, ठाण्यातील ५०० रुग्णालये बेकायदा

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • सिविक

महाराष्ट्र राज्यात एकूण ७४२ रुग्णालये नियमबाह्य असून त्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील एकूण ५०० रुग्णालये आणि नर्सिंगहोम बेकयदेशीर चालत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बेकायदा रुग्णालयांच्या गंभीर प्रश्नावर दाखल जनहित याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.

बेकयदेशीर रुग्णालयाला चाप

राज्यात बेकायदेशीर सुरू असलेली रुग्णालये बंद करण्याचा पवित्रा घेत राज्य सरकारने मुंबईसह सर्व राज्यातील तब्बल 4 हजार 966 रुग्णालयांची शहानिशा करण्यास सांगितलं असता, राज्यात एकूण 1770 नर्सिंग होम नियमबाह्य असल्याची बाब उघड झाली आली.

मुंबईत विशेष तपासणी मोहीम

मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार या विभागातील एकूण 13 हजार 763 रुग्णालयांची विशेष तपासणी केली असता 475 रुग्णालये नियमबाह्य असल्याचं आढळून आलं आहे.

रुग्णालयांची नोंदणीच नाही?

नियमबाह्य रुग्णालयांपैकी 329 रुग्णालयांची बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अंतर्गत नोंदणीच झाली नसून 81 रुग्णालयात बोगस डॉक्टरांच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

नियमबाह्य रुग्णालये

  • नाशिक -1770
  • लातूर - 981
  • नागपूर - 850
  • पुणे - 740
  • औरंगाबाद - 670
  • ठाणे - 485
  • अकोला - 480

हेही वाचा -

महिन्याभरात नवा वृक्ष अधिकारी नेमा! ठाणे महापालिकेला न्यायालयाचा दणका

बेकायदा बांधकामांना मालमत्ता कर रकमेच्या दुप्पट दंड

पुढील बातमी
इतर बातम्या