महापालिका म्हणतेय ९० टक्के नालेसफाई पूर्ण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत (mumbai) दरवर्षी जास्तीचा पाऊस झाल्यास मुंबईची तुंबई होते. पावसाचं पाणी साचल्यानं रस्ते व रेल्वे वाहतूक ठप्प होते. मात्र पाऊस जरी जास्त झाला तरी पावसाचं पाणी साचण्याचं नेमकं कारण म्हणजे नाल्यांची अपूरी सफाई. कारण अनेकदा नालेसफाई न झाल्यानं महापालिकेनं धारेवर धरलं जातं. पालिका (bmc) नालेसफाईचा दावा करते परंतू, तरिही पाणी कसं साचतं असा सवाल सामन्या विचारत आहेत? विशेष म्हणजे यंदाही महापालिकेनं तब्बल ९० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. शिवाय, ४ टक्केच सफाई बाकी असल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी साचणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

मुंबईत हाती घेण्यात आलेली पावसाळापूर्व नालेसफाईची ९० टक्के का मे पूर्ण झाल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मुंबई शहर भागात नालेसफाईचं अवघे ४ टक्के काम शिल्लक असून लवकरच ते पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील लहान-मोठे नाले, नद्यांची साफसफाई केली जाते. गाळ उपसन आणि कचरा हटवून पाण्याला वाट मोकळी करून देण्यात येते.

मुंबईमध्ये यंदा २२ फेब्रुवारीपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत नालेसफाईचे शहरात ९६ टक्के, उपनगरांत ९१ टक्के, तर पश्चिम उपनगरांत ९४ टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती मिळते. अंतिम टप्प्यात आलेले नालेसफाईचे काम येत्या ३१ मेपूर्वी पूर्ण होईल, असा दावाही महापालिकेनं केला आहे.

ब्रिटिशकालीन मलजलवाहिन्या आणि मनुष्याला प्रवेश करता येत नाही अशा वाहिन्यांच्या सफाईसाठी यंदा यंत्राचा वापर करण्यात येत आहे. साफसफाई कितपत झाली याची पडताळणी करण्यासाठी रोबोटिक सीसी टीव्ही कॅमेराचा वापर करण्यात येत आहे. नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहेत.

मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता पावसाळ्यात सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नालेसफाई केल्यामुळे साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा होईल.


हेही वाचा -

फेसबुक-ट्विटर, इन्स्टाग्रामला भारतात बंदी?

राज्यात मंगळवारी २४,१३६ कोरोनाचे नवीन रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या