Advertisement

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती

तौक्ते चक्रीवादळाचा भारतीय नौदलाला चांगलाच बसला आहे. कारण या वादळाला आता ४ दिवस होत आले असले तरी भारतीय नौदलानं शोधमोहीम चालूच ठेवली आहे.

Tauktae Cyclone: नौदलाचे शोधकार्य अद्याप सुरूच; २६ बेपत्ता, ४९ मृतदेह हाती
SHARES

तौक्ते चक्रीवादळाचा भारतीय नौदलाला चांगलाच बसला आहे. कारण या वादळाला आता ४ दिवस होत आले असले तरी भारतीय नौदलानं शोधमोहीम चालूच ठेवली आहे. आयएनएस कोच्ची, आयएनएस कोलकाता या युद्धनौकांसह नौदलाची अन्य जहाजे, टेहळणी विमान आणि सी-किंग हेलिकाॅप्टर्स समुद्रात घिरट्या घालत आहेत.

पी ३०५ या बार्जवरील १८६ जण आणि वरप्रदा बोटीवरील २ अशा १८८ जणांना नौदलानं आतापर्यंत सुखरूप किनाऱ्यावर आणलं आहे. तर, ४९ जणांचे मृतदेह हाती लागले असून उर्वरित २६ जणांचा शोध अद्याप सुरू असल्याचं नौदलानं स्पष्ट केलं. चक्रीवादळाच्या तडाख्यानं ४९ जणांचे मृत्यू  झाले तर २६ बेपत्ता लोकांच्या सुखरूप सुटकेच्या आशा मावळल्या असून, या दुर्दैवी घटनेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारला जात आहे.

ओएनजीसीसह उत्खनन करणारी अफ्काॅन्स कंपनी तसंच, बार्ज चालक डर्मस्ट यांच्याकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात आहे. हवामान खात्यासह तटरक्षक दलानं तौक्ते चक्रीवादळाचा इशारा १४ मे रोजी दिला होता. मात्र, ओएनजीसीनं त्याकडे दुर्लक्ष करून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

अफ्कॉन्सने बार्जला सुरक्षित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी त्याचे संचालन करणाऱ्या कंपनीवर असल्याचा दावा केला आहे.  चक्रीवादळाच्या सूचनेनंतर सर्व जहाजांना नियमानुसार सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या, असाही दावा त्यांनी केला. मात्र, सूचना मिळून बार्ज किनाऱ्यावर आणली नाही. दोन दिवसांचे काम बाकी असल्याने असे करण्यात आले. चक्रीवादळ प्रत्यक्ष धडकण्यापूर्वीच समुद्रात हालचाल जाणवत होती. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडूनही करण्यात येत आहे.



हेही वाचा -

मुख्यमंत्री करणार चक्रीवादळग्रस्त रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा

आरेतील रस्त्याचं बांधकाम महापालिकेमार्फतच होणार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा