Advertisement

आरेतील रस्त्याचं बांधकाम महापालिकेमार्फतच होणार

आरे वसाहतीतील विविध मुलभूत प्रश्न, तेथील आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन, तबेल्यांचा प्रश्न, छोटा कश्मीरसह विविध उद्यानांचा विकास, स्थानिक आदिवासींना वीज-पाणी आदी सुविधांची उपलब्धता यावर बैठक आयोजित करण्यात आली होती.

आरेतील रस्त्याचं बांधकाम महापालिकेमार्फतच होणार
SHARES

मुंबईच्या आरे वसाहतीतील विविध मुलभूत प्रश्न, तेथील आदिवासी पाड्यांचे पुनर्वसन, तबेल्यांचा प्रश्न, छोटा कश्मीरसह विविध उद्यानांचा विकास, स्थानिक आदिवासींना वीज-पाणी आदी सुविधांची उपलब्धता याबरोबरच आरे वसाहतीमधील अनधिकृत बांधकामं रोखणे अशा विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या पाठपुराव्यानुसार, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं बैठक झाली.

माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र वायकर यांच्या विनंतीनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला आमदार सुनील प्रभू, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, डेअरी आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड आदी उपस्थित होते.

यावेळी आरे वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचं बांधकाम, देखभाल-दुरुस्ती याबाबत चर्चा झाली. हे काम मुंबई महापालिकेमार्फत (bmc) व्हावे यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागामार्फत नाहरकत दिली जाईल, असं दुग्धविकास मंत्री सुनील केदार म्हणाले. आरे वसाहतीमधील छोटा काश्मीरसह मुंबईकरांचं आकर्षण असलेल्या इतर उद्यानांचा विकास करण्यात यावा, असा मुद्दा आमदार रवींद्र. वायकर यांनी मांडला. त्यावर वसाहतीतील ४ उद्यानांचा विकास करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- चक्रीवादळानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर ८७% अधिक कचरा जमा

वसाहतीतील आदिवासी पाड्यांचं पुनर्वसन करण्याच्या प्रश्नावर यावेळी सविस्तर चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनाच्या घरांसाठीच्या विविध योजनांमधून तसंच आदिवासी विकास विभागाच्या सहाय्याने वसाहतीतील आदिवासी बंधुंना त्यांच्या गरजांनुसार चांगली घरे देऊन त्यांचं पुनर्वसन करता येईल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करुन हा विषय सोडविण्यात येईल, असं सुनील केदार (sunil kedar) म्हणाले.

यावेळी वसाहतीतील शासकीय बंगले व निवासस्थाने, आरे रुग्णालय, पोलीस ठाण्याची जागा हस्तांतरित करण्याचा प्रश्न, होस्टेलचा प्रश्न, वसाहतीमधीलअनधिकृत बांधकामे रोखणे अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली. आरे वसाहत ही मुंबईच्या पर्यावरणाच्या अनुषंगाने महत्वाचं ठिकाण आहे. त्यामुळे येथील पर्यावरणीय महत्त्व जपत स्थानिक नागरिक, आदिवासी यांना सोयी-सुविधा देण्यात येतील, असं मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं.

(sunil kedar held a meeting on aarey colony development work)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा